मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे यांचा 'लाइगर' (Liger) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाता प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. विजय देवरकोंडानेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले.
बॉक्स ऑफिसवर आलेला निकाल अपेक्षेपेक्षा खूपच वाईट होता. चित्रपटाला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद आणि प्रेक्षकांची उदासीनताही याला कारणीभूत ठरली. हे सर्व मिळून, 'लाइगर' नं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आणि चित्रपटानं पहिल्या दिवशी देशभरात केवळ 15.95 कोटी रुपयांची कमाई केली.
आता 'लाइगर'चं रविवारचं कलेक्शन समोर आलं आहे आणि ते पाहिल्यानंतर असं म्हणता येईल की विजयच्या चित्रपटाचं भविष्य धोक्यात आलं आहे. सुरुवातीला 'Liger' नं पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर 5.50 कोटींची कमाई केली. हे या चित्रपटाचं भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे.
25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'लाइगर'नं बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी 7.7 कोटी रुपये आणि शनिवारी 6.95 कोटी रुपयांची कमाई केली. त्यात रविवारच्या अंदाजे आकडेवारीचीही भर घातली तर या चित्रपटानं आतापर्यंत भारतात फक्त 30 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस गल्ला केला.
परदेशातूनही 'लायगर'ला फारसा चांगला प्रतिसाद मिळला नाही. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरात सुमारे 42 कोटींचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केले (Liger Worldwide Collection). चौथ्या दिवसाचं भारताचं कलेक्शन ज्या प्रकारे झालं, त्यावरून गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 'लायगर'चं आंतरराष्ट्रीय कलेक्शनही खूप कमी झाल्याचे समोर आलं आणि एकूणच कथा अशी आहे की विजयच्या चित्रपटानं 4 दिवसात जगभरात 50 कोटींचा टप्पा ओलांडला नाही. यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचे म्हटले जातं आहे.