बॉयफ्रेंडला सोडून रस्त्यांवर चेहरा लपवून 'या' व्यक्तीसोबत फिरतेय Hina Khan!

हिना खान लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे

Updated: Aug 21, 2022, 08:59 PM IST
बॉयफ्रेंडला सोडून रस्त्यांवर चेहरा लपवून 'या' व्यक्तीसोबत फिरतेय Hina Khan! title=

मुंबई : हिना खान लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. जिने आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. हिना सध्या टीव्ही सीरियल्सच्या दुनियेपासून दूर असली तरी तिच्या म्युझिक व्हिडीओजवर तिचा दबदबा आहे. त्याचबरोबर, हिना नुकतीच दिल्लीला पोहोचली जिथे ती दिल्ली 6 च्या रस्त्यावर चेहरा लपवत फिरताना दिसली. खरंतर यावेळी ती बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत दिसली नाही. हिना खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती संध्याकाळी ओल्ड दिल्लीत फिरताना दिसत आहे.

शाहीर शेखसोबत केली मजा 
या व्हिडिओमध्ये हिना खान मास्क घातलेली दिसत आहे. पण ती बॉयफ्रेंडसोबत दिसली नसून सध्या  ती शाहीर शेखसोबत दिल्लीत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये शाहीर तिला विचारत आहे की, ती कुठे जात आहे, तेव्हा हिना सांगते की, ती तिथल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातेय. त्यानंतर दोघंही स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

हिना खानचं शाहीर शेखसोबत खास नातं आहे. गेल्यावर्षी दोघांचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. त्यानंतर त्यांची मैत्री चांगलीच घट्ट झाल्याचं दिसत आहे. दोघंही दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसत होते. आता ते दिल्लीत एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिट ठरली होती. त्यानंतर तिने शो सोडून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ती खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावरही तिचं वर्चस्व आहे.