संजय दत्तच्या एक्स पत्नीसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या लिएंडर पेसचं 10 वर्षांचं नातं तुटलं

भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आज किम शर्माबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. 

Updated: Jul 16, 2021, 10:21 PM IST
संजय दत्तच्या एक्स पत्नीसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या लिएंडर पेसचं 10 वर्षांचं नातं तुटलं  title=

मुंबई : भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आज किम शर्माबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच हे दोघं गोव्यात सुट्टीचा आनंद घेताना दिसले होते आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची अफवा जोरात सुरू झाली. बरं, पहिल्यांदाच लिएंडरचं नाव एखाद्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं नाही. यापूर्वी तो महिमा चौधरीला डेट करण्यामुळे चर्चेत आला आहे.

लिएंडर आणि महिमाचं अफेअर सुमारे सहा वर्षे चाललं. एका वृत्तानुसार, संजय दत्तची एक्स पत्नी रिया पिल्लई हिच्याशी लिएंडरची जवळीक वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात पेच निर्माण झाला होता. लग्नानंतर रिया लिएंडरच्या प्रेमात पडली आणि संजयबरोबर तिने घटस्फोट घेतल्यानंतर ती लिएंडरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. 

मीडिया रिपोर्टनुसार,लिएंडर आणि रियाची 2003 मध्ये पहिल्यांदा भेट झाली. यानंतर या दोघांची जवळिकता वाढू लागली आणि अखेर रियाचा संजय दत्तपासून घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रिया आणि लिएंडर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघेही अमेरिकेत आठ वर्षे एकत्र राहिले या दोघांपासून यांना एक मुलगी आहे.

2013मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला. 2014 मध्ये रियाने लिएंडर आणि त्याच्या वडिलांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावून सगळ्यांनाच धक्का दिला. रियाने असंही उघड केलं होतं की, लिएंडरने तिच्यासोबत गुपचूपपणे लग्न केलं होतं मात्र लिएंडरने या गोष्टी नाकारल्या आणि सांगितलं की, त्याने रियाशी लग्न केलं नाही. 

रियाने असंही म्हटलं होतं की, मुलगी अयानाला ब्रेन ट्यूमर आहे आणि घरातील खर्चात तिला लिएंडरकडून कोणतीही मदत मिळत नाही. ती तिच्या मित्रांकडून कर्ज घेऊन मुलाचं संगोपन करून घर चालवित आहे. या आरोपांनंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि लिएंडरने रियाला दरमहा दीड लाख रुपयांची पोटगी देणं सुरू केलं. अशाप्रकारे या दोघांचं नातं वाईट प्रकारे संपलं.