'लता मंगशेकर यांची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका'

ब्रीच कँडी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारूख  उदवाडिया यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत.

Updated: Nov 15, 2019, 12:00 AM IST
'लता मंगशेकर यांची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका'  title=

मुंबई : लता मंगशेकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असली तरी स्थिती चिंताजनक असल्याच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याच्या प्रकृतीबद्दल केवळ अफवा पसरत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

ब्रीच कँडी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारूख  उदवाडिया यांच्या देखरेखीखाली औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी लता दीदींना घरी आणण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर होती मात्र ती अफवा असल्याचे समोर आले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

लता दीदींना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे रूग्णालयात दाखल केलं. त्याचप्रमाणे त्यांना न्युमोनिया देखील झाला आहे. तसेच ह्रदयाचा त्रास देखील वाढला आहे. फुफ्फुसांमध्ये पाणी झालं असल्याचं डॉक्टर सांगत आहेत.