मुंबई : संगीत कलाविश्वात डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वांनात आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार, गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. बप्पी दा यांनी अनेक गाणी गायली आणि त्यांच्या गाण्यामुळे अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळाली, तर अनेक गायकांच्या प्रेरणास्थानी बप्पी दा होते...
गेल्या अनेक दशक त्यांनी बॉलिवूडसाठी त्यांच्या आवाज दिला आहे. त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं 'बागी 3' सिनेमातील होतं. त्या गाण्याचं नाव आहे 'भंकस..' हे गाणं अभिनेता टायगर श्रॉफ अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या चित्रीत करण्यात आलं आहे.
खरं तर 'भंकस..' हे गाणं 1984 साली प्रदर्शित झालेल्या 'तोहफा' सिनेमातील 'एक आंख मारूं तो' गाण्याचं रिमिक्स व्हर्जन आहे. 'एक आंख मारूं तो' गाण्याला किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आवाज दिला.
बप्पी लहरी यांनी 1970 ते 1980 दरम्यान अनेक सुपरहीट गाणी बॉलिवूडला दिली. त्यांना वेगळ्या प्रकारच्या म्युझिकमध्ये फार आवड होती. आज बॉलिवूडमध्ये डिस्को सॉन्ग्स आहेत, तर त्याचं श्रेय बप्पी दा यांना जात... असं म्हणायला हरकत नाही...
'चलते-चलते', 'शराबी' आणि 'डिस्को डान्सर' यांसारख्या अनेक गाण्यांवर फक्त बॉलिवूडकरांनी नाही, तर तुम्ही देखील ठेका धरला... त्यांनी संगीतदिग्दर्शन, गायन यासोबतच रिऍलिटी शोसाठी परीक्षकाचीही भूमिका बजावली होती.