शीतलीच्या हातावर रंगणार अजिंक्यच्या नावाची मेहंदी

पाहा मेहंदीचे खास फोटो 

 शीतलीच्या हातावर रंगणार अजिंक्यच्या नावाची मेहंदी title=

मुंबई : 'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लगीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे. शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमाला अनेकांचा विरोध होता पण तो विरोध न जुमानता त्यांच्या प्रेमावरील दृढ विश्वासामुळे ते दोघे लवकरच एकत्र येणार आहेत. लग्नाची बोलणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा मुहूर्त ३० मेचा निघाला आहे.

दोन्ही घरात लगीनघाई आणि लगबग दिसून येतेय. लग्नाची खरेदीपासून ते अगदी मेहंदी, हळद अशा सर्व कार्यक्रमाची तयारी करण्यात दोन्ही कुटुंबीय व्यस्त आहेत. शीतलच्या हातावर अजिंक्यच्या नावाची मेहंदी लागली आहे, संगीतमध्ये सर्व जण आनंदाने थिरकणार आहेत, तसेच सौभाग्याचं लक्षण म्हणजेच हिरवा चुडा शीतलच्या हातात भरण्यात आला आहे. लग्न जरी सामूहिक लग्न समारंभात होणार असलं तरी बाकीचे कार्यक्रम अगदी आनंदाने दोन्ही कुटुंबीय पार पडणार आहेत.

ही सर्व धमाल मस्ती प्रेक्षक २५ मे पासून प्रेक्षक लागीर झालं जी मध्ये संध्याकाळी ७ वाजता पाहू शकणार आहेत.