'...आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते'' कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट व्हायरल

Kushal Badrike Instagram: कुशल बद्रिकेनं पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधवची मिमिक्री केली आहे. यावेळी (Kushal Badrike News) त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते, सध्या हा व्हिडीओ (Kushal Badrike Video) चर्चाचा विषय ठरला. 

Updated: Apr 24, 2023, 10:14 PM IST
'...आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते'' कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट व्हायरल title=
फोटो - कुशल बद्रिके / इन्टाग्राम

Siddharth Jadhav Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिके हा चला हवा येऊ द्या स्किटमध्ये अनेकदा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Kushal Badrike and Siddharth Jadhav) याची भुमिका करताना दिसतो. त्याच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होताना दिसते. सिद्धार्थ जाधवसमोरही त्यानं अनेकदा त्याची मिमिक्री केली आहे. सिद्धार्थ जाधवचे लोकप्रिय डायलॉग्सही तो अगदी हुबेहुब त्याच्यासारखेच बोलतो. त्यामुळे सिद्धार्थ जाधव चला हवा येऊ द्या मध्ये कोण तर पहिलं नावं हे कुशल बद्रिकेचेच येते. 'दे धक्का' (Kushal Badrike Mimicry) नाहीतर 'खो-खो' या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांची मिमिक्री कुशल बद्रिके आरामात करतो. सध्या कुशलचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय की, माझ्यावर जेव्हा सिद्धार्थ जाधव करण्याची वेळ येते... सध्या हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. 'झी मराठी' वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या हा' कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमावर आजही अनेक लोकं हे भरपूर प्रेम करतात. 'चला हवा येऊ द्या'चे असंख्य चाहते जगभरात आहेत. या क्रार्यक्रमातला (Chala Hawa Yeu Dya) अभिनेता कुशल बद्रीके हाही एक लोकप्रिय कलाकार आहे. ज्याचंही फॅन फॉलोईंग हे भरपूर आहे. या शोमधील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. 

या व्हिडीओमध्येही अभिनेता कुशल बद्रिके हा हुबेहुब सिद्धार्थ जाधवची मिमिक्री (Mimicry VIDEO) करताना दिसतो आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की ते त्यानं सिद्धार्थप्रमाणेच कपडे परिधान केले आहेत. तेव्हा हा व्हिडीओ हा सर्वत्र व्हायरल होतो आहे.यावेळी 'महाराष्ट्र शाहीर' या आगामी बहुचर्चित सिनेमाची चर्चा आहे. तेव्हा यावेळी या टीमनंही कुशलची मिमिक्री एन्जॉय केली आहे. यावेळी शोमध्ये आलेले पाहूणे हे पोटभरून हसताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ शेअर करत कुशलनं लिहिलं आहे की, 'आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते'. आणि या व्हिडीओत सिद्धार्थ जाधवला टॅगही केले आहे. यावेळी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची संपुर्ण टीम यावेळी या एपिसोडसाठी हजर होती. यावेळी सना शिंदे, अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत, भरत जाधव आदी कलाकारांसह (Maharashtra Shahir) टीम उपस्थित होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे केदार शिंदे यांनी केले आहे तर संगीत दिग्दर्शन हे अजय - अतुल यांनी केले आहे. 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.