क्रिती होऊ शकते संजूबाबाची ३०९वी गर्लफ्रेंड

'माझा जीवनप्रवास बाकी आहे'  

Updated: Dec 5, 2019, 12:30 PM IST
क्रिती होऊ शकते संजूबाबाची ३०९वी गर्लफ्रेंड title=

मुंबई : आशुतोष गोवारिकरच्या दिग्दर्शनाखाली साकारल्या गेलेल्या आणि अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेवर भाष्य करणाऱ्या 'पानिपत' ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता संजय दत्त, क्रिती सनॉन आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्रिकूट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यासाठी हे कलाकार थेट ‘द कपिल शर्मा’शोमध्ये पोहोचले आहेत. 

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, शोमध्ये संजयने आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांवर भाष्य केले. दरम्यान कपिनने त्याला 'संजू' चित्रपटतील एक प्रश्न विचारला. चित्रपटात त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

त्यावर त्याने फार मजेशीर उत्तर दिले, मी नेहमी माझ्या गर्लफ्रेंड मोजत असतो आणि कायम मोजत राहणार. चित्रपटात क्रितीच्या भूमिकेने मला फार प्रभावित केलं आहे. त्यामुळे ती माझी ३०९वी गर्लफ्रेंड होऊ शकते. असे विनोदी उत्तर त्याने दिले. त्याचप्रमाणे माझा जीवनप्रवास अद्याप संपला नसल्याचे तो म्हणला.

'पानिपत' चित्रपट उद्या रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 'पानिपत'मध्ये अभिनेता अर्जुन कपूर हा सदाशिव रावांच्या भूमिकेत झळकणार आहे. पार्वती बाई साकारण्याची जबाबदारी अभिनेत्री क्रिती सेनन हिने निभावली आहे. अभिनेता संजय दत्त चित्रपटात अहमद शाह अब्दालीच्या रुपात झळकेल. आता हा चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.