मुंबई : गणेशोत्सव जवळ आला की, बाप्पाच्या गाण्याबरोबरच ठेका धरायला लावणारी अनेक गाणी व्हायरल होतात. असंच एक गाणं व्हायरल झालं आहे. ज्यावर अनेकांना ठेका धरायला लागणारच आहे.
हे गाणं 'रेडू' या सिनेमातील असून गुरू ठाकूरने ते गाणं लिहिलं आहे. 'कुकुर कुकुर कोंबडो घालतो कुकारो' असे या गाण्याचे बोल आहेत. आपल्याला माहितच आहे गणेशोत्सव हा उत्सव मुंबई बरोबरच कोकणात हा उत्सव अधिक उत्साहाने साजरा केला जातो. कोकणी माणूस कुठेही असला तरीही गणपतीसाठी तो गावी जाणारच असं अनेकदा आपण अनुभवलं आहे आणि ऐकलं देखील आहे. तर याच कोकणी माणसाला गावात मिरवणुकीत ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे.
'रेडू' या सिनेमातील हे प्रमोशन साँग असून गणपतीच्या दिवसांमध्ये याला रिलीज करण्यात आलं आहे. सागर वंजारी हा नवोदित दिग्दर्शक ‘रेडू’ हा चित्रपट आपल्यासमोर घेऊन येत आहे. याच चित्रपटातील पहिलं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं. गुरू ठाकूर याने हे गाणं एकदम कोकणी झटकेबाज स्टाईलमध्ये लिहीलं असून त्याला संगीत देताना विजय गवांडे यानीही कोकणी संगीताचा पुरेपुर बाज यामध्ये वापरला आहे. मनीष राजगिरे रावडी आवाजात हे गाणं ऐकायला आणि शशांक शेंडेचे गाण्यातील हावभाव बघायला अधिकच भारी वाटतं. ‘रेडू’ बद्दल तर उत्सुकता आहेच पण यांसारखी आणखी दोन-तीन हटके स्टाईल गाणी ऐकायला मिळाल्यास रसिकांना आनंदच होईल.