प्रियांका चोप्रा Lesbian? 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला धक्कादायक खुलासा

प्रियांकाचं धक्कादायक वक्तव्य...

Updated: Sep 9, 2022, 01:24 PM IST
प्रियांका चोप्रा Lesbian? 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला धक्कादायक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan 7) या त्याच्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या प्रत्येक सीझनमध्ये काही कलाकार हजेरी लावताना दिसतात. यामध्ये देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील आहे. यंदाच्या सीझनमध्ये अजून प्रियांका दिसली नाही. तरी देखील प्रियांका चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिचा एक थ्रोबॅक एपिसोड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेळी प्रियांकानं कबूल केलं होतं की, तिला एकदा एका महिलेनं प्रपोज केलं होतं. एका मुलीनं प्रपोज केल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रियांकानं कमिटेड असल्याचं खोटं सांगितलं. 

आणखी वाचा : Queen Elizabeth II च्या आमंत्रणाला अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार, जाणून घ्या कारण

2014 साली प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये प्रियांकासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) देखील हजेरी लावली होती. यावेळी करणनं प्रियांकाला प्रश्न विचारला की 'लेस्बियन एन्काउंटर' झाला आहे का? यावर प्रियंका म्हणाली, की हो तसं झालं आहे. 'मला या भेटीविषयी जास्त माहित नाही पण एका महिलेनं मला प्रपोज केलं होतं.'

आणखी वाचा : Aishwarya Rai Troll : वय लपवण्यासाठी ऐश्वर्यानं असं काय केलं की होतेय ट्रोल, पाहा फोटो

पुढे प्रियांका म्हणाली, 'हे काही वर्षांपूर्वी एका नाइट क्लबमध्ये झालं होतं. ती मुलगी खूप गोड स्वभावाची होती. मी लेस्बियन नाही हे तिला कसं सांगू हे मला कळत नव्हते, कारण त्या मुलीला मी ओळखत होते.' पुढे प्रियांका म्हणाली, करण देखील त्या मुलीला ओळखतो. मी फक्त त्या मुलीला सांगितलं की बेब माझा बॉयफ्रेंड आहे आणि खऱ्या आयुष्यात त्यावेळी माझा कोणी बॉयफ्रेंड नव्हता. त्या मुलीत आणि माझ्यात काही होऊ शकलं असतं पण मला मुलं आवडतात.' (Koffee With Karan When Priyanka Chopra Faced Lesbian Encounter In The Club Karan Johar Was Also know That Person) 

आणखी वाचा : Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांकानं अलीकडेच रुसो ब्रदर्ससोबत तिच्या पहिल्या वेब सीरिज 'सिटाडेल'चं शूटिंग पूर्ण केलं. याशिवाय तिच्याकडे 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' हा चित्रपटही आहे. ती शेवटची 'द व्हाइट टायगर'मध्ये राजकुमार राव आणि आदर्श गौरवसोबत दिसली होती. आता प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत 'जी ले जरा' या फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे.