अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा एश्वर्या राय बच्चन श्रीमंत? किती आहे प्रॉपर्टीची किंमत; वाचा

ऐश्वर्या राय बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक खूप मोठं नाव आहे. 

Updated: May 29, 2022, 03:42 PM IST
अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा एश्वर्या राय बच्चन श्रीमंत? किती आहे प्रॉपर्टीची किंमत; वाचा title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक खूप मोठं नाव आहे. मिस वर्ल्ड बनलेली ऐश्वर्या आज फार चित्रपट करत नाही. पण तरीही ती शंभर कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. एका अहवालानुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती100 मिलियन डॉलर सुमारे 776 कोटी रुपये आहे. तर बिग बी सुमारे 2946 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रॉपर्टी विषयी सांगणार आहोत.

 

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका वृत्तानुसार, ऐश्वर्या प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी कमावते. तिची फी तिच्या भूमिकेवर अवलंबून असते.

बिझनेस व्हेंचर
अभिनेत्री असण्यासोबतच ऐश्वर्या राय बच्चन एक बिझनेस वुमन देखील आहे. ऐश्वर्या एन्वायरन्मेंटल इंटेलीजेंस स्टार्टअपमध्ये एंजल इन्वेस्टर आहे आणि तिने 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसंच, तिचं स्वतःचं हेल्थकेयर स्टार्टअप Possible आहे.  काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायने महाराष्ट्रातल्या एक विंड पावर प्रोजेक्टला फंड दिला होता. 

रिअल इस्टेट प्रॉपर्टी
ऐश्वर्या राय बच्चन तिचा पती अभिषेक बच्चन आणि सासू अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत तिच्या जलसा या  बंगल्यात राहते.  ज्याची किंमत 112 कोटी रुपये आहे. तसंच, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे दुबईतील जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये एक आलिशान व्हिला आहे. ऐश्वर्याचं मुंबईतील बीकेसी भागात 21 कोटींचं अपार्टमेंट असून ते 38 हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने खरेदी करण्यात आलं आहे.

ब्रँड एंडोर्समेंट
Exchange4Media नुसार, ऐश्वर्या राय बच्चन ब्रँड एंडोर्समेंटमधून दरवर्षी 80 ते 90 कोटी रुपये कमावते आणि दिवसाला 6 ते 7 कोटी रुपये घेते. L'Oreal, Longines, LUX, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, Titan Watches, Lakme Cosmetics, Philips, Prestige, Pepsi आणि Lodha Group सारखे अनेक ब्रँड ऐश्वर्याच्या जाहिरातींच्या यादीत आहेत.

वाहने
ऐश्वर्या राय बच्चनकडेही अनेक आलिशान वाहनं आहेत. तिच्याकडे 7.95 कोटी रुपयांची  Rolls Royce Ghost, Rs 1.60 कोटी रुपयांची Mercedes Benz S350d Coupe,1.58 कोटी रुपयांची Audi A8L, Lexus LX 570 आणि Mercedes Benz S500 अशी वाहनं आहेत.