जुहीला आमिरने असं काय भविष्य सांगितलं...ती दुसऱ्या दिवशी शुटिंगला आली नाही आणि ७ वर्ष बोलली नाही

जुही चावला अमिरकडे भविष्य विचारण्यासाठी गेली तेवढ्यात आमिर तिच्या हातावर थुंकला

Updated: Apr 20, 2021, 02:21 PM IST
जुहीला आमिरने असं काय भविष्य सांगितलं...ती दुसऱ्या दिवशी शुटिंगला आली नाही आणि ७ वर्ष बोलली नाही title=

मुंबई : 1995 मध्ये इंदर कुमार 'दिल' आणि 'बेटा' या सारखे दोन नवीन चित्रपट सुरू करणार होते. पहिला चित्रपट होता 'इश्क'. आमिर खान, जूही चावला, अजय देवगन आणि काजोल यात काम करत होते. दुसर्‍या चित्रपटाचं नाव ठरलं नव्हतं मात्र मुहूर्त आधीच झाला होता. या सिनेमांत अमिताभ बच्चन, आमिर खान आणि माधुरी दीक्षित काम करणार होते. माध्यमांनुसार 'रिश्ता' असं या चित्रपटाचं नाव होतं. जे कदाचित चित्रपटाचं तात्पुरतं शीर्षक होतं.

जेव्हा 'इश्क'च्या शूटिंग दरम्यान आमिर खान जूही चावलाच्या हातावर थुंकला
'इश्क' या सिनेमांत आमिर खान, जूही चावला, अजय देवगन आणि काजोल काम करत होते. आमिर आणि अजय सिनेमाच्या सेटवर भरपूर मस्ती करायचे. दलीप ताहिलसोबत चित्रपटाच्या एका सीनचं शूटिंग चालू होतं. सेटवर असलेल्या माणसाकडे आमिर-अजयने पावडरसारखी वस्तू मागितली. जेव्हा हे सर्व घडत होतं, तेव्हा आमिरने दलीपला गोंधळात टाकलं. पावडर येताच अजयनं गुपचुप पॅकेट आमिरकडे दिलं.

आमिरने आपलं बोलणं संपवून दलीपच्या मागे जाऊन शांतपणे पॅकेट उघडलं. आणि पावडर दलीपच्या कपड्यात टाकली. दलीप ताहिल अचानक अस्वस्थ झाला, त्याला वाटलं की, त्याला बरेच डास एकावेळी चावतायेत. पण त्याचवेळी सेटवर उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. अजयने आमिरला दिलेली पावडर खाज सुटणारी पावडर होती.

'इश्क' हा त्याचा सातवा सिनेमा होता. या सेटवर एकदा आमिर म्हणाला की, ''मला ज्योतिष समजतं. मी हात पाहून लोकांचं भविष्य सांगू शकतो'' यावंर जुही चावला त्याच्याकडे हात दाखवण्यासाठी गेली तेवढ्यात आमिर तिच्या हातावर थुंकला

जूहीला या गोष्टीचा राग आला. ती रडू लागली तिने धमकी देत सांगितलं
जूहीला या गोष्टीचा राग आला. ती रडू लागली तिने धमकी देत सांगितलं की, ''मी उद्यापासून शूटच्या सेटवर येणार नाही. प्रत्येकाला असं वाटले की, जूही असं रागाने बोलत आहे. दुसर्‍या दिवशी संपूर्ण कास्ट आणि क्रू सेटवर पोहोचले पण जुही आली नाही. त्यानंतर दिग्दर्शक इंदर कुमार यांना या प्रकरणाचं गांभीर्य समजलं. आमीर आणि अजयसोबत तो जुहीच्या घरी पोहोचले. या दोघांनी जूहीकडे माफी मागितली आणि ही भांडण ईथेच संपली.

या घटनेनंतर जूही पहिल्यांदा जेव्हा सेटवर आली. तेव्हा आमीरने रागात सांगितलं की, सेटवर न येण्याचा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा होता. ईथे सगळी तयारी झाली होती. मात्र तुझ्या अनुपस्थितीमुळे शूटिंग होऊ शकलं नाही, जिने निर्मात्यांचे पैसे एका दिवसासाठी खराब केले. जुहीला आमिरचा मुद्दा समजला होता. या नंतर आमिर आणि जुही यांच्यातील संवाद ईथेच थांबला. जूही जिथे- जिथे जायची तिथे- तिथे आमिर तिथून ५० फूट अंतरा ठेवायचा. यांच्यातलं कर्न्व्हसेशन पूर्णपणे थांबलं होतं. दोघेही, शूटिंग पुरतेच एकमेकांसोबत बोलू लागले. या घटनेनंतर जुही आणि आमिर पुढील सात वर्षे बोलले नाहीत.

मग सात वर्षांनंतर तिला कळला की, आमीरला असं वाटलं की, जूही माझ्यावर रागावली आहे. त्याच वेळी, आणि त्याचवेळी जूहीला असं वाटलं की आमिर माझ्यावर रागावला आहे. या गोंधळामुळे दोघेही सात वर्षे बोलले नाहीत. मात्र, आता दोघांचे चांगले संबंध आहेत. मात्र 'इश्क' नंतर जुही आणि आमिरने कधीच एकत्र काम केलं नाही.