या निमित्तानं पुन्हा एकदा युवराज सिंग आणि तिच्यात संवाद झाला....

अभिनेत्रीने तिच्या पोल-डान्सिंग सेशनचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. 

Updated: Aug 13, 2021, 06:40 PM IST
या निमित्तानं पुन्हा एकदा युवराज सिंग आणि तिच्यात संवाद झाला....  title=

मुंबई : अभिनेत्री किम शर्माने तिच्या पोल-डान्सिंग सेशनचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये किम ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा आणि गुलाबी शॉर्ट्स घालून पोल डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत किमने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मिड वीक स्पिन @ aarifa.pole.burnt याच्या सोबत. किमच्या या व्हिडिओवर आता किमचा एक्स-बॉयफ्रेंड युवराज सिंगने तिच्या कमेंट दिली आहे, "वाह काय सूर आहेत. मॅडम तुम्ही कोणतं गाणं गात आहा'', याचबरोबर मोहब्बतें सिनेमातील सह-अभिनेत्री प्रीती झांगियानी हिने देखील तिची प्रशंसा केली आहे आणि लिहिलं आहे की, "खूप छान!

किम शर्माचा हा व्हिडिओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. एकाने चाहत्याने लिहिलं की, 'मी हा व्हिडिओ दिवसभर लूप करत पाहू शकतो. काहींनी चाहत्यांनी तिला 'सुंदर' आणि तिचे पोल-डान्सिंग कौशल्य उत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. युवराज आणि किम जवळजवळ तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. परंतु 2007मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. आजकाल किम टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करण्यामुळे चर्चेत आहे. तर युवराजने अभिनेता हेजल कीचसोबत लग्न केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

किम युवराजची पत्नी हेजलची मैत्रिण आहे. ती 2019मध्ये हेझेलचं 'युरीपीड्स मेडिया' हे नाटक पाहण्यासाठी गेली होती. युवराजने यापूर्वी किमला तिच्या इन्स्टाग्राम पोस्टबद्दल छेडलं होतं. गेल्यावर्षी जेव्हा किमने बिकिनीमधील फोटो शेअर केले होते, तेव्हा युवराजनं लिहिलं होतं की, "गाव स्थायिक नाही झालं पण मॅडम तिची बॅग घेऊन पोहोचली.