मुंबई : चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. सुहाना खान असो, अनन्या पांडे किंवा शनाया कपूर, स्टार किड्सचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. जर आपण या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सबद्दल बोललो तर बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरला कसं विसरता येईल.
खुशी कपूर स्टाईलच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही
स्टाईल आणि लूकच्या बाबतीत, खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जान्हवी कपूरची धाकटी बहीण अद्याप चित्रपटात उतरली नसली तरी ती सोशल मीडियावर तिच्या फोटोंद्वारे तिच्या चाहत्यांची मने कायमच जिंकते.
खुशी कपूर क्लासी लूकमध्ये
जान्हवी कपूरचं स्टाईल स्टेटमेंट सर्वांनी पाहिलं आहे. पण खुशी कपूर तिच्या मोठ्या बहिणीपेक्षा कमी नाही. अलीकडेच तिने मिनी स्कर्ट आणि टॉपमधील स्मार्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुंदर दिसण्यासोबतच खुशी क्लासी देखील दिसत आहे. या लूकसोबत अभिनेत्रीने बूट घातले आहेतय त्याचबरोबर मोकळे केस ठेवत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
चाहत्यांना झाला प्रचंड आनंद
खुशी कपूरने नुकतेच शेअर केलेले फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. काहींनी तिला सुंदर तर काहींनी जबरदस्त म्हणत तिची प्रशंसा केली आहे. जान्हवी कपूरलाही आपल्या बहिणीला पाहून आश्चर्य वाटलं. तिने तिच्या फोटोवर "राजकन्या राणी परी, माझा लाडू, माझी झिंगरी, माझा म्हैसूर पाक, माझा बंगाराम" अशी कमेंट केली आहे. या फोटोंवर हँड इमोजी पाठवून वीर पहाडियाने खुशीचं कौतुक केलं आहे.
खुशी कपूरचं वर्कफ्रंट
खुशी कपूर लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. अनेक स्टार किड्सना घेऊन बनवलेला हा चित्रपट असेल. त्यामुळे केवळ खुशी कपूरच नाही तर सुहाना खान, अगस्त्य नंदा यांच्यासह अनेक स्टार किड्स पहिल्यांदाच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहेत. हा चित्रपट थेटर ऐवजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.