Khushbu Sundar : जस्टिस हेमा कमेटीच्या रिपोर्टनंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठा वाद पेटला आहे. या रिपोर्टनंतर या प्रकरणात सतत नवे खुलासे होत आहेत. तर यात भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीतील या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधीत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं की लहान असताना त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यासोबत झालेल्या छळाविषयी सांगितले आहे.
खुशबू सुंदर यांनी एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी महिलांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यासोबत त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या छळा विरोधात देखील आवाज उठवला आहे. खुशबू सुंदर म्हणाल्या, 'आपल्या इंडस्ट्रीमध्ये #MeToo मुमेंट्सनं आपल्या सगळ्यांना तोडलं आहे. आपल्या शब्दावर ठाम राहून यशस्वी झालेल्या त्या महिलांना सलाम. असे गैरव्यवहार थांबवण्यासाठी हेमा समितीची खूप गरज आहे. पण हे असं होईल? सगळ्याच क्षेत्रात महिलांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अत्याचार, 'तडजोडी'चा आग्रह करण्याची अपेक्षा घडते. हे दुःख स्त्रीनं एकटीनं का सहन करावे अशी अपेक्षा असते? पुरुषांनाही याचा सामना करावा लागत असला, तरी त्याचा मोठा फटका हा महिलांनाच सहन करावा लागतो.'
पुढे त्या म्हणाल्या, या मुद्द्यावर मी माझ्या 24 वर्षांचा आणि 21 वर्षांच्या मुलींशी खूप वेळ चर्चा केली. त्यांच्यात पीडितांविषयी असलेली समज असल्याची पाहून मला आश्चर्य झालं. त्या पीडितांच्यासोबत असून त्यांना पाठिंबा देत आहेत. हे महत्त्वाचं नाही की तुम्ही आज बोला किंवा उद्या, कमीत कमी बोला तरी. लगेच बोललो की त्यातून बाहेर पडणं सोप होतं आणि त्याच्यात तपासात खूप मदतही होते.'
पुढे खुशबू सुंदर म्हणाल्या, 'लाज वाटण्याची भीती, पीडितला दोषी ठरवणं आणि तुम्ही असं का केलं? तुम्हाला असं काही करण्यास मजबूर केलं होतं? असे प्रश्न त्यांना तिथेच अपयशी ठरवतात. पीडित या आपल्यासाठी किंवा तुमच्यासाठी अनोळखी असू शकतात, पण त्यांना तुमच्या पाठिंब्याची आणि भावनिक आधाराची गरज असते. जेव्हा आपण विचार करतो की त्या आधी का बोलल्या नाही, तेव्हा आपण त्यांच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येकाला बोलण्यासाठी किंवा आवाज उठवण्यासाठी विशेष अधिकार नसतात.'
पुढे त्या म्हणाल्या, 'एक महिला आणि आईच्या रुपात असं काही पाहिल्यावर किंवा हिंसा पाहिल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसतो. फक्त शरीर नाही तर आत्मा देखील हादरून जाते. ही क्रुरता आमचा विश्वास, प्रेम आणि तारदीला हलवून ठेवतात. प्रत्येक आईच्या मागे चिंता आणि सुरक्षेचा विषय हा असतो आणि जेव्हा ही पवित्रतात तुटते तेव्हा याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होतो.'
हेही वाचा : सलमानला सोफ्यावरून उठायला होई ना; VIDEO पाहताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता म्हणाले...
काही लोकं मला विचारतात की मी वडिलांनी केलेल्या छळाविषयी बोलण्यासाठी इतका वेळ का घेतला. मला माहित आहे की मी याविषयी आधीच बोलायला हवं होतं, पण माझ्यासोबत जे झालं होतं ते माझ्या करिअरला बनवण्यासाठी करण्यात आलेली तडजोड नव्हती. जे हात मला धडपडताना सांभाळू शकत होते त्याच हातांनी माझा छळ केला. मी सगळ्या पुरुषांना विनंती करते की तुम्ही पीडितांसोबत उभे राहा आणि तुमचे समर्थनं दाखवा. प्रत्येक पुरुषाचा जन्म एका महिलेपासून झाला आहे जिनं खूप हाल-अपेष्ठा सहन केल्या आहेत. तुमच्या सांभाळ करण्यात अनेक महिलांची महत्त्वाची भूमिका असते. त्यात तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवतात, ती आई, बहीण, काकू, शिक्षिका आणि मैत्रिण असते.