असीम रियाजला 'खतरों के खिलाडी 14' दाखवला बाहेरचा रस्ता; कारण...

Khatron Ke Khiladi 14 Asim Riaz : 'खतरों के खिलाडी 14' मधून असीम रियाजला दाखवला बाहेरचा रस्ता...

दिक्षा पाटील | Updated: Jun 4, 2024, 05:19 PM IST
असीम रियाजला 'खतरों के खिलाडी 14' दाखवला बाहेरचा रस्ता; कारण... title=
(Photo Credit : Social Media)

Khatron Ke Khiladi 14 Asim Riaz : रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 14' आपल्या नव्या सीजनच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. भारतापासून दूर रोमानियामध्ये 'खतरों के खिलाडी'च्या नवीन सीझनचं शूटिंग नुकतंच सुरू झालं असून स्पर्धकांमध्ये भांडण, मारामारी आणि वादामुळे हा शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. मात्र, अनेक थरारक स्टंट, अॅक्शनसाठी ओळखला जाणारा हा शोचा यंदाचा सीझन शालीन आणि असीम रियाझ यांच्या भांडणामुळे चर्चेचा विषात ठरतोय. 

नुकतंच 'बॉम्बे टाईम्स'नं वृत्त दिलं की, रियालिटी शो 'खतरों के खिलाडी 14' मधून स्पर्धक असलेल्या असीम रियाजला बाहेर काढण्यात आलं होत. आधी या शोचा होस्ट असलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत झालेल्या वादानंतर असीम रियाझला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता नवी बातमी अशी आहे की, असीम रियाझचे शोमधील सहस्पर्धक असेलेल्या शालिन भानोताशी झालेल्या जबरदस्त भांडणामुळे बाहेर काढण्यात आलं आहे. असीमनं 'बिग बॉस 13' मध्ये त्याचा सहस्पर्धक असेलत्या  शालिन भानोटसोबत गैरवर्तन आणि भांडण केल्याचं सांगितलं जातय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सूत्रांनुसार, एका टास्कमध्ये असीम रियाझनं शालिन भानोतला शिवीगाळ करत तो त्याच्या अंगावर धावून गेला होता. या शोमधील स्पर्धक असलेल्या अभिषेकची शालीनसोबत चांगली मैत्री आहे आणि ही मैत्री 'बिग बॉस 13' पासून असल्याचं सांगितलं जातं. अभिषेक कायम शालीनला सपोर्ट करताना आणि त्याच्या बाजूनं उभा राहताना दिसला. याच कारणामुळे अभिषेकचे असीमसोबतही भांडणही झाले. असीम रियाझ हे दोघे ही त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखला जातो. आता याच कारणामुळे त्याला शोमधून बाहेर काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. 

हेही वाचा : संगीता बिजलानीला भेटायला सायकल चालवत पोहचला होता सलमान खान!

आता या बातमीचे पडसाद  सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहेत. नेटकरी 'खतरों के खिलाडी 14' मध्ये घडलेल्या घट्नेची तुलना 'बिग बॉस 13' मध्ये त्याच्या आणि सिद्धार्थ शुक्लासोबत झालेल्या भांडणांसोबत करताना दिसत आहेत. 'खतरों के खिलाडी 14' च्या नवीन सीझनमध्ये करण वीर मेहरा, कृष्णा श्रॉफ, निमृत कौर अहलुवालिया, सुमोना चक्रवर्ती, शिल्पा शिंदे, नियती फतनानी आणि अदिती शर्मा हे कलाकार आहेत.