'या' वन्य प्राण्याचा अभिनेत्रीच्या पायाला चावा? अभिनेत्रीची अवस्था अशी की...

यावेळी खतरों के खिलाडी 12 शोमध्ये धोक्याची पातळी जास्त असणार आहे. 

Updated: Jul 5, 2022, 06:54 PM IST
'या' वन्य प्राण्याचा अभिनेत्रीच्या पायाला चावा? अभिनेत्रीची अवस्था अशी की... title=

मुंबई : यावेळी खतरों के खिलाडी 12 शोमध्ये धोक्याची पातळी जास्त असणार आहे. शोच्या पहिल्या भागापासूनच स्पर्धकांना कठीण स्टंटचा सामना करावा लागत आहे. पण शोच्या आगामी भागात असा खतरनाक स्टंट होणार आहे, की बघून तुमचा श्वासच थांबेल.

हाइनासोबत झाला कनिकाचा सामना आणि मग...
होय, शोच्या आगामी भागाचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका स्टंटमध्ये कनिका या भयंकर हायनाचा सामना करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रोमोमध्ये रोहित शेट्टी म्हणताना दिसत आहे,  जेव्हा ते कळपात एकत्र येतात तेव्हा सिंहही पळून जातात.

रोहित शेट्टी कनिकाला सांगतो की, हायना तुझ्यासोबत पिंजऱ्यात असेल. हे ऐकून सगळेच थक्क होतात. भयंकर हायना पाहून, कनिकाच्या किंचाळ्या ऐकून कोणाचंही हृदय हादरून जाईल.

घाबरलेले स्पर्धक
प्रोमोमध्ये पुढील डॉक्टर कनिकावर उपचार करताना दिसत आहेत. कनिकाची अवस्था पाहून अनेक सेलिब्रिटींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. जन्नत जुबेर, राजीव अदातिया आणि रुबिना दिलीकही रडू लागतात. प्रोमोमध्ये तुषार कालिया 'पाय खाल्ला पुर्ण' असं म्हणताना दिसत आहे. कनिकाचा पाय खरंच हायनाने खाल्ला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बरं, हा एपिसोड ऑन एअर झाल्यानंतरच कळेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रोमो व्हिडिओ समोर येताच, अनेक युजर्स कनिका मानची काळजी करत आहेत आणि कनिका बरी आहे अशी आशा करत आहेत. खतरों के खिलाडी 12 चा हा प्रोमो व्हिडिओ सर्वांचं हृदय हेलावत आहे. व्हिडिओतील स्पर्धकांचा हादरलेला आणि घाबरलेला चेहरा पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, यावेळी शोमध्ये धोक्याची पातळी किती उंचावर असणार आहे.