माधुरी दीक्षितसोबत kelly paul ने धरला ठेका, पाहा Viral Video

व्हिडीओमध्ये किली पॉल आणि माधुरी ‘चने के खेत में’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे.   

Updated: Oct 6, 2022, 03:55 PM IST
माधुरी दीक्षितसोबत kelly paul ने धरला ठेका, पाहा Viral Video  title=

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोण फेमस होईल हे सांगता येत नाही. असाच एकजण स्टार झालेला व्यक्ती म्हणजे किली पॉल (kelly paul).  नुकतंच  ‘झलक दिखला जा’ शोमध्ये सोशल मीडिया स्टार किली पॉलने (social media star kelly paul) हजेरी लावली. शोमध्ये त्याने अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत (madhuri dixit ) एका प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरला. सध्या किली पॉल आणि माधुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये किली पॉल आणि माधुरी ‘चने के खेत में’ (chane ke khet mein) गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दोघांच्या डान्सचा व्हिडीओ माधुरी दीक्षितच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या किली पॉल आणि माधुरीचा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. पाहा व्हिडीओ... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल ( kili paul) याने पुन्हा एकदा या अप्रतिम व्हिडिओद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओमध्ये किली पॉल आणि माधुरी दीक्षित गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. 

कोण आहे किली पॉल?
किली पॉल हा एक सोशल मीडिया स्टार असून तो टांझानियाचा आहे. तो कायम बॉलिवूड गाण्यावर रिल्स इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. सोशल मीडिया स्टार असला तरी, एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीप्रमाणे त्याच्या चाहत्यांची संख्या आहे. इन्स्टाग्रामवर किलीचे 42 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.  (kelly paul social media)