"तुम्हाला वाईट वाटू शकतं, पण अभिषेक तुमच्यापेक्षा चांगली एक्टिंग करतो", वाचा थेट अमिताभ यांच्यासमोर असं का म्हटलं?

शोच्या एका भागात नागालँडचे डीजीपी रुपिन शर्मा सहभागी झाले होते. 

Updated: Aug 18, 2022, 06:38 PM IST
"तुम्हाला वाईट वाटू शकतं, पण अभिषेक तुमच्यापेक्षा चांगली एक्टिंग करतो", वाचा थेट अमिताभ यांच्यासमोर असं का म्हटलं? title=

Amitabh Bachchan KBC : सध्या 'कौन बनेगा करोडपती'चे 14 पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शोवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. सामान्य नागरिकांना अमिताभ बच्चन यांच्याशी स्पर्धेच्या निमित्ताने थेट संवाद साधता येतो.

नुकताच या शोच्या एका भागात नागालँडचे डीजीपी रुपिन शर्मा सहभागी झाले होते. त्यांच्याची संवाद साधताना रूपीन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर सांगितलेली एक गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. 

मागच्या भागात विमल हे स्पर्धक निघून गेल्यानंतर फास्टेस्ट फिंगर राऊंडमध्ये नागालॅंडचे डीजीपी रूपिन शर्मा सहभागी झाले. तेव्हा हॉट सीटवर रंगलेल्या गप्पांमध्ये रूपिन यांनी बिग बींना एक व्हिडीओही दाखवला. ज्यात रूपिन यांचे सहकारी अमिताभ यांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. त्यानंतर रूपिन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर थेट त्यांच्या मुलाचे म्हणजेच अभिषेकचेही कौतुकही केले आहे. 

अभिषेकचं कौतुक करताना ते बीग बीेना म्हणाले, ''वाईट वाटून घेऊ नका पण अभिषेक हा तुमच्यापेक्षाही चांगला अभिनेता आहे.''

यावेळी अभिषेकच्या 'दासवी' या चित्रपटाबद्दल त्यांनी अभिषेकचं खूप कौतुक केले. यावर खुद्द बिग बीही सहमत झाले आणि म्हणाले, ''तुम्ही अगदी बरोबर आहात, अभिषेकला हे ऐकून आनंद होईल.'' अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रियाही मांडली.