ओ परजाई जीssss ; पाहा कौशल कुटुंबीयांनी कसं केलं कतरिनाचं स्वागत

कतरिना आणि विकीकडे पाहतच रहावं अशीच काहीशी चाहत्यांची अवस्था होती. 

Updated: Dec 10, 2021, 12:52 PM IST
ओ परजाई जीssss ; पाहा कौशल कुटुंबीयांनी कसं केलं कतरिनाचं स्वागत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास विकी कौशल आणि कतरिनानं त्यांच्या विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये कतरिना आणि विकीकडे पाहतच रहावं अशीच काहीशी चाहत्यांची अवस्था होती. 

खास उपस्थितांच्या हजेरीत विकी- कॅटनं त्यांच्या या नव्या प्रवासाची सुरुवात केली. ज्यानंतर सर्वांनीच त्यांना गोड अंदाजात शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

कलाकारंनी कतरिनाचा मिसेस कौशिक होण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. पण, त्यासोबतच विकीच्या कुटुंबानंही तिचं भव्य आणि अतिशय गोड अंदाजात स्वागत केलं. 

अनुष्काला विकी- कतरिनाबद्दल नेमकं काय खटकतंय? 

 

विकीचा भाऊ, सनी कौशल यानं एक फोटो पोस्ट करत घरातील नव्या सुनेचं आणि आपल्या हक्काच्या वहिनीचं स्वागत केलं. 

'आज हृदयात आणखी एका व्यक्तीसाठी जागा झाली. कुटुंबात तुमचं खूप स्वागत... वहिनी.... या गोड जोडीसाठी खुप सारं प्रेम आणि त्यांच्या आयुष्यभराच्या आनंदासाठी शुभेच्छा...', असं त्यानं एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

'परजाई जी...', असं म्हणत त्यानं अस्सल पंजाबी अंदाजात कतरिनाचं स्वागत केलं. 

सनीनं त्याच्या वहिनीचं केलेलं हे स्वागत पाहता कौशल कुटुंबात खऱ्या अर्थानं कतरिनाची ग्रँड एंट्री झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.