KBC 15 : 'कौन बनेगा करोडपति 15' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सात वर्षांच्या मुलानं ते करून दाखवलं जे कोणी करू शकलं नाही. रोल ओव्हर कंटेस्टंट विराट अय्यरनं 25 लाख रुपये जिंकल्यानंतर देखील त्यानं खेळ सुरुच ठेवला. विराटनं ज्या प्रकारे प्रश्नाची उत्तर दिली ही पाहून अभिनेता अमिताभ बच्चन देखील आश्चर्यचकीत झाले होते. विराटला या एपिसोडमध्ये 50 लाख रुपयांसाठी एक प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत तो 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला.
25 लाख रुपयांसाठी विराटला प्रश्न विचारण्यात आला की 1939 मध्ये स्नो व्हाइटएंड द सेवेन ड्वार्फ्ससाठी देण्यात आलेला ऑस्कर कसा वेगळा होता? त्यासाठी देण्यात आलेले चार ऑप्शन्स हे पुढील प्रमाणे आहेत.
A) यात 7 छोट्या ऑस्करच्या मुर्त्या होत्या.
B) या पांढऱ्या रंगाच्या होत्या.
C) या मुर्त्या बर्फापासून बनवल्या होत्या.
D) त्यांना कोणतंही नावं नव्हते.
हेही वाचा : भाऊ कदमनं सोडली इंडस्ट्री? कॉमेडीवीरचा 'हा' फोटो होतोय व्हायरल
त्यावर उत्तर देत विराटनं A हा ऑप्शन निवडला आणि ते योग्य उत्तर आहे. त्यानंतर विराटला 50 लाख रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला की खालील दिलेल्या कोणत्या तीन देशाच्या राष्ट्रध्वजांमध्ये लाल, पांढरा आणि निळा रंग आहे? त्यावर ऑप्शन होते.
A) क्यूबा
B) कोलंबिया
C) कोलंबिया
D) जमैका
कोणतीच लाइफलाइन शिल्लक नव्हती त्यामुळे विराट काही काळ विचार करत होता. त्यानंतर त्यानं 50 लाख रुपये जिंकले. तर पुढे असाच तो 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाकडे वळला.
पुढे विराटला 1 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला की आवर्त सारणीमध्ये परमाणुंची संख्या ही 96 आणि 109 असणाऱ्या तत्वांच्या नावात काय युनिक आहे?
A). नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावावर आहे.
B) महिला वैद्यानिकांच्या नावावर
C) भारतीय वैद्यानिंकाच्या नावावर
D) त्यांचं काही नाव नाही.
यावेळी विराट हा वेगवेगळ्या शोधांविषयी सांगतो आणि ऑप्शनविषयी विचार करतो. त्यावेळी अमिताभ त्याला म्हणाले की जर तुला योग्य उत्तर माहित नसेल तर तू इथेच गेम सोड. मात्र, विराटनं चुकिचा निर्णय घेतला. त्यानं ऑप्शन A निवडला. त्यानंतर हे योग्य उत्तर नसून ऑप्शन B हे योग्य उत्तर असल्यानं त्यांनी सांगितलं. त्यामुळे विराट घरी फक्त 3. 20 लाख रुपये घेऊन जाऊ शकला.