हिमानी बुंदेला KBC 13च्या पहिल्या करोडपती; अंधत्वावर मात करत दिली जगण्याची नवी आशा

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोच्या या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. 

Updated: Aug 26, 2021, 05:11 PM IST
 हिमानी बुंदेला KBC 13च्या पहिल्या करोडपती; अंधत्वावर मात करत दिली जगण्याची नवी आशा title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' आता आपली 13 वर्षे पूर्ण करणार आहे. या शोशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. शोचा 13 वा सीझन सुरू झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या शोच्या या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. हिमानी बुंदेला यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. हिमानी बुंदेला एक दृष्टिहीन स्पर्धक आहेत.

हिमानी बुंदेला आता 7 कोटी रुपयांसाठी गेम पुढे नेतील का हे तुम्हाला शोमध्ये दिसेल. अमिताभ बच्चन हिमानीला एक कोटी जिंकल्याबद्दल अभिनंदन करतात आणि हिमानीही आनंदाने उड्या मारतात. सोनी टीव्हीच्या इंस्टाग्रामवर 'कौन बनेगा करोडपती 13'चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हिमानीचं अभिनंदन करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हिमानीला सांगतात की, तू एक कोटी रुपये जिंकले आहेस. यानंतर हिमानी खूप खुश होते.

7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देईल का
मग अमिताभ बच्चन यांना 16 वा प्रश्न 7 कोटी रुपयांना विचारतात. प्रोमो वरून हे स्पष्ट होतं आहे की, हिमानी देखील 16 व्या प्रश्नाचं उत्तर लॉक करते. 16 वा प्रश्न 7 कोटी रुपयांचा आहे. हा टप्पा पार करणं सोपं नाही. या प्रश्नासाठी लाईफलाईनचा वापर देखील करू शकत नाहीत, मात्र तरीही हिमानी कोणाताही संकोच न करता प्रश्नाचं उत्तर देतात.

एपिसोड 30-31 ऑगस्ट रोजी रिलीज केला जाईल
हिमानी बुंदेला यांनी खेळ उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे. 15 प्रश्नांचा टप्पा पार करणे सोपं नाही. आता हे पाहावं लागेल की, हिमानी 7 कोटी रुपयांना उत्तर देण्यास सक्षम आहेत की, नाही. या भागाचं प्रसारण 30-31 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता केलं जाईल. ही पोस्ट शेअर करताना, सोनी टीव्हीच्या अधिकृत हँडलवर लिहिलं होतं की, 'हिमानी बुंदेला, एक दृष्टिहीन स्पर्धक आहे जी आनंदाने आपलं आयुष्य जगते, ती केबीसी 13 ची पहिली करोडपती बनली आहे. पण ती 7 कोटींच्या प्रश्नाला योग्य उत्तर देऊ शकणार का?' हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.