नीना गुप्तात आईची फिलिंग नाही, तर ती मला XX वाटते, आयुष्यमान खुराना हे काय बोलून गेला...

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 

Updated: Dec 16, 2021, 08:09 PM IST
नीना गुप्तात आईची फिलिंग नाही, तर ती मला XX वाटते, आयुष्यमान खुराना हे काय बोलून गेला... title=

मुंबई : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 1982 मध्ये 'ये नजरिया' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या नीनाने आपल्या प्रत्येक पात्राने लोकांची मने जिंकली आहेत. तिने टीव्ही दुनियेतही खूप काम केलं आहे. यावेळी नीनाने नॅशनल टेलिव्हिजनवर असा खुलासा केला आहे. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नीना गुप्ता यांनी 'कौन बनेगा करोडपती 13' च्या शुक्रिया एपिसोडमध्ये 'बधाई हो'मध्ये भूमिका मिळवण्यासठी  एका हाऊस हेल्परने सलवार कमीज परिधान केला होता. तिने सांगितलं की, 'बधाई हो' ची स्क्रिप्ट तिला सुरुवातीलाच खूप आवडली होती. पण तिने कधीही दिग्दर्शकाला फोन केला नाही. मात्र, जेव्हा तिला चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा यांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलावण्यात आलं तेव्हा परिस्थिती बदलली होती.

नीना यांनी पुढे सांगितलं की, तेव्हा मला नॉर्मल सलवार परिधान करायचा होता. पण माझ्याकडे नॉर्मल सलवार नव्हता. मी विचार हाच विचार करत होते की नेमकं, काय करू? तेव्हा मी माझ्या घरच्या हेल्परची सलवार घातली कारण ती साधी आणि पांढरी रंगाची सलवार होती. मीा ती सलवार कमीज घालून अमित शर्मा यांच्या ऑफिसमध्ये गेले. आणि मी त्यांना म्हणाले, 'सर सलवार ठीक आहे ना, मी माझ्या हाऊस हेल्परची सलवार घातली आहे'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतकंच नाही तर या अभिनेत्रीने यापूर्वी निवड न होण्यामागचं खरं कारणही उघड केलं. ती म्हणाली की, मला नंतर कळलं की, जेव्हा सगळे बसून बोलत होते, तेव्हा आयुष्मान खुरानाला समजलं की, मी त्याच्या आईची भूमिका साकारणार आहे. तेव्हा तो म्हणाला होता की, मी त्याच्या आईच्या भूमिकेसाठी परफेक्ट नाही  म्हणून मी भूमिका करू नये. आयुष्मान म्हणाला की, ''मी खूप हॉट आहे. त्याला माझ्या बाजूला बघून 'मम्मी'चा फील येत नाही''. 'KBC 13' मध्ये नीना अभिनेता गजराज रावसोबत खास पाहुणी म्हणून दिसणार आहे.