Katrina Kaif baby bamp: आलिया पाठोपाठ कतरिनाही होणार आई? कतरिनाच्या Airport वरील लूकमुळे चर्चांना उधाण; पाहा व्हिडिओ

Updated: Jul 15, 2022, 04:58 PM IST
Katrina Kaif baby bamp: आलिया पाठोपाठ कतरिनाही होणार आई? कतरिनाच्या Airport वरील लूकमुळे चर्चांना उधाण; पाहा व्हिडिओ title=

मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे आणि यानिमित्ताने ती आपला वाढदिवस आपल्या नवऱ्यासोबत विकी कौशलसोबत साजरा करणार आहे. यानिमित्ताने विकी कौशलने मालदीवमध्ये खास व्हेकेशन पॅक बुक केला आहे. कतरिना कैफ लवकरच 'फोन बूथ', 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून दिसणार आहे. याशिवाय कतरिना फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा चित्रपटदेखील करते आहे. या चित्रपटात ती आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत मुख्य भूमिकेत आहे. 

बी-टाऊनचे प्रसिद्ध स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे नुकतेच फ्रेश फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या काही मित्रांसह मालदीवला रवाना झाले आहेत. यादरम्यान पापाराझींनी त्याला मुंबई एअरपॉर्टवर घरले त्यामुळे विकॅटचा सोशल मीडियावर एक व्हिडिओसमोर आला आहे ज्यात विकी कतरिनासोबत मालदीवसाठी निघाला आहे.  

कतरिना कैफचे हे फोटो समोर येताच पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी विकी कौशल क्लीन शेव्हन लूकमध्ये दिसला, तर सर्वांच्या नजरा कतरिनाच्या स्वेटशर्टवर खिळल्या होत्या. कतरिना कैफ सध्या लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर आहे, त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांना जोर आला आहे. शुक्रवारी कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत मुंबई एअरपॉर्टवर दिसली. तिने जीन्स आणि ऑरेंज स्वेट शर्टचा लुक ठेवला होता. फोटोंमध्ये कॅन्ट्रीना आणि विकी एकमेकांचा हात धरलेले दिसले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना आणि विकीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विकी कौशलने हिरवे जॅकेट, काळी कॅप आणि कार्गो पँटसह त्याचा लूक केला. विकी पत्नी कतरिना कैफचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला रवाना झाला आहे.