Katrina Kaif ची डुप्लिकेट दिसते खुपच बोल्ड, Photo पाहून थक्क व्हालं

कॅटरीना पेक्षा तिच्या डुप्लिकेट अभिनेत्रीची जास्त चर्चा, सौदर्यांत तिलाही देते टक्कर, Photo पाहिलेत का? 

Updated: Nov 3, 2022, 08:35 PM IST
Katrina Kaif ची डुप्लिकेट दिसते खुपच बोल्ड, Photo पाहून थक्क व्हालं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे डुप्लिकेट असतात. हे डुप्लिकेट त्यांच्यासारखेच हुबेहुब दिसत असतात. आता अशीच एक  डुप्लिकेट समोर आली आहे. ही डुप्लिकेट बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif)  सारखी दिसते. तिचे फोटो पाहून तुम्हाला देखील असेच वाटेल. दरम्यान कॅटरीनाची डुप्लिकेट दिसणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण, हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीवर लाईव्ह शोदरम्यान दगडफेक, VIDEO आला समोर 

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) सारखी दिसणारी ही अभिनेत्री एमी ऐला (Amy Aela) आहे. एमीने आपल्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून फार कमी वेळात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एमीच्या या यशाचे काही श्रेय बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) देखील जाते. कारण अनेक लोक एमीला (Amy Aela) कतरिनाच्या लूक लाइक म्हणून ओळखतात.

हे ही वाचा : Halloween निमित्त प्रसिद्ध अभिनेत्रीचा हटके लूक, VIDEO पाहून तुम्हालाही येईल किळस

कोण आहे 'ती' डुप्लिकेट?

एमी ऐला (Amy Aela) ही अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सर आणि बिझनेस वुमन देखील आहे. याशिवाय एमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिच्या फोटो आणि व्हिडिओला खुप लाईक्स आणि कमेंटस मिळत असतात. इंस्टाग्रामवर एमी एलाला 1 दशलक्षहून अधिक लोक फॉलो करतात. 

डुप्लिकेट का म्हणतात?

सोशल मीडियावर अनेक लोक एमी ऐलाला (Amy Aela) कॅटरीना कैफची (Katrina Kaif)  लूक लाइक म्हणूनही ओळखतात. एमीचा साईड लूक मोठ्या प्रमाणात कॅटरीना कैफच्या लुकशी जुळतो. त्यामुळेच तिला कॅटरीना कैफची डुप्लिकेट म्हणतात. कॅटरीना प्रमाणेच एमीचे लुक किलर असतात. या शिवाय अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते.

एमी (Amy Aela) तिच्या इंस्टाग्रामवर खुप अॅक्टीव्ह असते. इंस्टाग्रामवर दररोज ती एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. हे फोटो चाहत्यांना खुप आवडत असतात. त्यामुळेच अॅमीही चाहत्यांशी जोडलेली राहण्याची संधी सोडत नाही. प्रत्येक वेळी ती तिच्या इंस्टाग्रामवर सिझलिंग आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहत असते.