कतरिनाचा मोठा गौप्यस्फोट अखेर दिली प्रेमाची कबुली

फोटो शेअर करत कतरिनाने व्यक्त केलं प्रेम

Updated: Sep 5, 2021, 10:40 PM IST
कतरिनाचा मोठा गौप्यस्फोट अखेर दिली प्रेमाची कबुली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने कोणावर तरी आपलं प्रेम व्यक्त केलं. आजकाल ती 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत.

हा कतरिनाचा लूक आहे
या फोटोंमध्ये कतरिना कैफ  ड्रॉप-डेड गॉर्जिअस दिसत आहे कारण तिने बोट-नेक फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीच्या स्किनवर गोल्डन चमक आहे कारण तिच्या शरीरावर सूर्याची किरणं पडत आहेत. 

कॅप्शनमध्ये व्यक्त केलं प्रेम 
फोटोसोबत कॅटरिना कैफने कॅप्शनमध्ये लिहिलं की,  ''U have my '' कतरिना आजकाल तुर्कीमध्ये आहे आणि तिने या देशाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. ती तुर्कीमध्ये आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानसोबत तिने तुर्कीची संस्कृती आणि पर्यटन मंत्री मेहमत नूरी एरसे यांची भेट घेतली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहते पाहतायेत 'टायगर 3'ची वाट 
मनीष शर्मा यांनी 'टायगर 3' दिग्दर्शन केलं आहे. कोविड -19 च्या जागतिक उद्रेकामुळे 'टायगर 3' स्थगित ठेवण्यात आलं होतं. कबीर खान दिग्दर्शित 'एक था टायगर' चा पहिला सीझन 2012 मध्ये रिलीज झाला होता. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'टायगर जिंदा है' 2017 मध्ये रिलीज झाला होता आणि  होता.