मुंबई : वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ नेहमी बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफ टाकत असते. यास्मिन कराचीवाला हिच्या जिममध्ये तिला घाम गाळताना आपण पाहिले असेल. पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही ती घाम गाळताना दिसते.
नुकतेच तिला टायगर जिंदा है च्या सेटरवर फिटनेस ट्रेनर रेझा कटानी हिच्यासोबत वर्कआऊट करताना दिसली. यात कतरिना आता जशी दिसते ती तिच्या मेहनतीमुळे आणि शिस्तीमुळे दिसते आहे. कतरिनाने केवळ फिटनेस केला नाही तर कतरिनाला आपले वर्कआऊट स्विमिंग पूलमध्ये करत आहे.
कतरिना पाणी उडवत आहे. ती वर्क आऊट करत त्यात आर्म, शोल्डर आणि कोअर मसल्सवर काम करत आहे. तसेच हा वर्कआऊट करताना आपण आलिया भटला मिस करत आहे असेही म्हटले आहे.