कश्मिरा शाहाचा बोल्ड अवतार करतोय चाहत्यांना घायाळ; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची हॉट हिरोईन आणि आयटम गर्ल कश्मिरा शाह आज पुन्हा एकदा तिच्या हॉट लुक्समुळे चर्चेत आली आहे.

Updated: Jul 17, 2022, 10:35 PM IST
कश्मिरा शाहाचा बोल्ड अवतार करतोय चाहत्यांना घायाळ; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूडची हॉट हिरोईन आणि आयटम गर्ल कश्मिरा शाह आज पुन्हा एकदा तिच्या हॉट लुक्समुळे चर्चेत आली आहे. आजकाल कश्मिरा शाह तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या कश्मिराने नुकताच तिचा एक बिकिनी व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पांढऱ्या बिकिनीमध्ये 'पातली कमर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.  हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण तिच्यावर घायाळ होत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कश्मिरा शाहने एक कॅप्शन लिहिलं आहे की, 'जंगलने 22 वर्षे पूर्ण केली आहेत.' 'जंगल' चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कश्मीरा शाह देखील दिसली होती.

हे गाणंही तिच्यावरच चित्रीत झालं होतं. तिच्याशिवाय या सिनेमात उर्मिला मातोंडकर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. आता चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.  कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा देखील बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. बिग बॉस 14 मध्ये येण्यापूर्वी कश्मिराने वजन कमी केलं होतं. तिच्या या मोठ्या बदलामुळे ती चर्चेत होती.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, कश्मिराने प्यार तो होना ही था, हिंदुस्तान की कसम, दुल्हन हम ले जाएंगे, हेरा फेरी, कही प्यार ना हो जाए, आशिक, आँखे, मर्डर आणि वेक अप सिड यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. ती टीव्हीवरील बिग बॉस सीझन 1 चा देखील भाग होती. यानंतर ती 2007 मध्ये कृष्णा अभिषेकसोबत नच बलिए 3 मध्ये दिसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कश्मिरा कृष्णापेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे पण दोघांनीही वयाची भिंत प्रेमाच्या आड येऊ दिली नाही. घरच्यांची मन वळवल्यानंतर त्याने १२ वर्षांच्या मोठ्या कश्मिरासोबत लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षानंतर 2017 मध्ये हे जोडपे सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचं पालक झालं.