मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि मृणाल ठाकूर यांचा 'धमाका' चित्रपट प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
चित्रपटाचा रिव्ह्यू समोर आल्यानंतर कार्तिक कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल अभिनेत्याने गणपती बाप्पाचे आभार मानले.
कार्तिक आर्यनचा 'धमाका' 19 नोव्हेंबरला सिनेमागृहात रिलीज झाला आहे. कार्तिक कुटुंबासह सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना दिसला.
सुरुवातीच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने कार्तिक आर्यनने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. कार्तिक या फोटोत पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये दिसत आहे. मंदिराला भेट दिल्यानंतर कार्तिक आर्यनने तिथे उपस्थित मुलांशी संवादही साधला.
अभिनेत्याने त्याच्या लहान चाहत्यांसाठी पोझही दिली. कार्तिकने आई-वडील आणि बहिणीसोबत सिद्धिविनायक मंदिराबाहेर पापाराझींना अनेक पोज दिल्या.