कार्तिक आर्यनचा जबरा फॅन, अभिनेत्यासाठी उचललं मोठं पाऊल

चाहत्याने केलेल्या या कृत्यामुळे कार्तिकही स्तब्ध 

Updated: Jan 6, 2022, 12:03 PM IST
कार्तिक आर्यनचा जबरा फॅन, अभिनेत्यासाठी उचललं मोठं पाऊल title=

मुंबई : 'प्यार का पंचनामा' फेम बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची फॅन फॉलोइंग खूप जबरदस्त आहे. त्याचे फॅन्स त्याच्यासाठी काय करतील आणी काय नाही याचा काही नेम नाही. त्याचे असे काही जबर चाहते आहेत जे त्यांच्यासाठी काहीही करू शकतात. आता एका चाहत्याने कार्तिक आर्यनसाठी असं काही केलयं, जे पाहून तो स्वत: थक्क झाला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

स्वतःच्या जीवावर बेतून केली 'ही' गोष्ट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कार्तिकच्या एका फॅनने त्याच्या छातीवर कार्तिकचा चेहऱ्याचा टॅटू कोरला आहे. कार्तिक स्वत:हा त्याला भेटायला गेला होता. विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर कार्तिकचा या फॅनसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.  कॅमेरासमोर हा फॅन कार्तिकला छातीवरचा टॅटू दाखवतो. त्याचा टॅटू पाहून कार्तिक थक्क झालेला या फोटोमध्ये दिसतय. 

घराबाहेर मुलींचा गलका 

काही दिवसांपुर्वी अश्याच दोन फॅन्सचा व्हिडिओ वायरल होत होता. त्यात यादोघी कार्तिकच्या घरी पोहोचल्या होत्या. कार्तिकच्या नावाने आवाज देत त्यांनी घराबाहेर कल्ला केला, कार्तिकला हे समजताच कार्तिकने त्या दोघींना भेट दिली आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले. अगदी कमी वेळात कार्तिकचे भरपूर फॅन झालेत त्याला इंस्ट्राग्रामवर 23 मिलियन फॅन्स आहेत.

कार्तिक आर्यनचं नाव अशा काही स्टार्सपैकी एक आहे ज्याने मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये मानाच स्थान कमावलय.  त्यांच्या जबरदस्त ऍक्टिंगमुळे त्याचा फॅनबेस खुप तगडा आहे. कार्तिकने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यापैकी  'प्यार का पंचनामा' मधून त्याला प्रसिद्धी मिळाली.

कार्तिक नुकताच 'धमाका'मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्यांनी स्टार न्यूज अँकरची भूमिका साकारली होती. जी चांगलीच पसंतीस उतरली होती. आता त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो 'भूल भुलैया 2', 'फ्रेडी', 'कॅप्टन इंडिया' आणि 'शेहजादा'मध्ये दिसणार आहे.