Kartik Aaryan-kiara Advani च्या 'भूल भुलैया 2' ची 'धाकड' कमाई, कंगना रणौत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

Updated: May 21, 2022, 09:05 PM IST
Kartik Aaryan-kiara Advani च्या 'भूल भुलैया 2' ची 'धाकड' कमाई, कंगना रणौत म्हणाली...  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र त्याच तुलनेत अभिनेत्री कंगना रणौतचा धाकड सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यामुळे साहजिकच कंगना नाराज होती. या नाराजीनंतर आता कंगना रणौतने 'भूल भुलैया 2' चित्रपटावर प्रतिक्रीया दिली आहे.  

कंगना राणौतचा 'धाकड' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हे सिनेमे एकाच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. मात्र कार्तिकच्या भूल भुलैया 2 ने पहिल्याच दिवशी 14.11 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर कंगनाचा चित्रपट आपटला. 

दरम्यान चित्रपटाचे कलेक्शन समोर आल्यानंतर कंगनाने 'भूल भुलैया 2' चित्रपटाची प्रशंसा करत पोस्ट शेअर केली. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हणते, हिंदी बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवल्याबद्दल भूल भुलैया 2 च्या टीमचे अभिनंदन. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीसह संपूर्ण टीमला शुभेच्छा. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.