Kiss करता येत नाही, म्हणून अभिनेत्याला द्यावे लागले 37 रिटेक; अभिनेत्रीला त्यानं...

अखेर अभिनेत्याने अभिनेत्रीसोबत घेतला असा निर्णय, त्यानंतर...   

Updated: Aug 31, 2022, 02:28 PM IST
Kiss करता येत नाही, म्हणून अभिनेत्याला द्यावे लागले 37 रिटेक; अभिनेत्रीला त्यानं... title=

मुंबई : 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन यानं हिंदी कलाजगतामध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटापासून सुरु झालेला त्याचा प्रवास आता जवळपास 10 वर्षे पुढं आला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख असलेला कार्तिक आर्यन सध्या आगामी 'शहजाता' सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांना अपयश मिळत असताना, कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. 

'भूल भुलैया 2' सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर अभिनेत्याच्या मानधनात पण वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असणारा कार्तिक त्याच्या काही गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागे कारण देखील फार वेगळं आहे. हा किस्सा अभिनेत्याच्या जुन्या सिनेमातील आहे. 

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, त्याला किस कसं करायचं हे माहित नव्हतं. त्यामुळे एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला किसिंग सीन करताना 37 रिटेक करावे लागले, मात्र किसिंग सीन परफेक्ट होऊ शकला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा  किस्सा आहे कार्तिकच्या 'कांची द अनब्रेकेबल' सिनेमाची. या सिनेमाचे दिग्दर्शक होते सुभाष घाई. त्यावेळी कार्तिकने 37 रिटेक दिले, पण दिग्दर्शकांना सीन आवडत नव्हता. 

पुढे अभिनेता म्हणाला, 'एका सीनमध्ये, सुभाषजींना पॅशनेट किसिंग सीन हवा होता. पण मला जमत नव्हतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्हीच करुण दाखवा, कसं करायचं आहे? त्या दिवशी मी आणि अभिनेत्री मिष्टी पूर्ण दिवस एका कपल प्रमाणे राहिलो. अखेरीस सुभाष यांना हवा तसा आम्ही शॉट दिला त्यानंतर ते आनंदी झाले'

कार्तिक आर्यनने सांगितले की मिष्टीसोबत हा एक सीन करण्यासाठी त्याला 37 रिटेक द्यावे लागले. अनेक सिनेमांतून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कार्तिक आर्यन अनेक  तरुणींच्या मनातील ताईद आहे.