Kartik Aaryanच्या करियरला लागलं 'ग्रहण'; 'या' चित्रपटाचा सायनिंग चेक केला परत

शाहरूख खानच्या रेड चीलीजच्या आगामी चित्रपटातून देखील बाहेर झाला आहे.

Updated: May 28, 2021, 07:55 AM IST
Kartik Aaryanच्या करियरला लागलं 'ग्रहण'; 'या' चित्रपटाचा सायनिंग चेक केला परत  title=

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन मध्यंतरी अभिनेत्री सारा अली खानसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत होता. पण गेल्या काही दिवसांपासून कार्तिक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या 'दोस्ताना 2' चित्रपटामधून काढता पाय घेतल्यानंतर कार्तिक अभिनेता शाहरूख खानच्या रेड चीलीजच्या आगामी चित्रपटातून देखील बाहेर झाला आहे. शिवाय कार्तिकने सायनिंग चेक देखील परत केल्याचं सांगितलं जात आहे.

आमची सहयोगी वेबसाइट  Bollywoodlife.comनुसार कार्तिक आर्यनने परस्पर संमतीने शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट सोडले आहे. त्याचप्रमाणे  'फ्रेडी' चित्रपटासाठी मिळालेला सायनिंग चेक देखील परत केला आहे.  'फ्रेडी' चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री कतरिना कॅप दिसणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकला चित्रपटाबद्दल काही क्रिएटीव्ह अडचणी होत्या, त्याला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नव्हती. कार्तिकने कथेबद्दल असमाधान व्यक्त केले. चित्रपट प्रेम कथेवर आधारित आहे. कार्तिकला भीती वाटली होती की रोमँटिक चित्रपटाच्या अनुषंगाने कतरिना त्याच्यासमोर वयस्कर दिसेल.

कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर,  तो लवकरचं अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत हॉरर कॉमेडी 'भूल भूलैय्या 2' या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय कार्तिक रोहित धवनच्या चित्रपटाकत देखील दिसणार आहे. तसेच रॉनी स्क्रूवाला निर्मित 'धमाका' चित्रपटातही दिसणार आहे. चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.