आईच्या 'त्या' अटीखातर अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम

प्रेम आणि युद्धात सगळं काही माफ असतं खरं.. पण अभिषेकला आईचा शब्द डावलता आला नाही... काय होती ती अट  

Updated: Mar 25, 2022, 11:18 AM IST
आईच्या 'त्या' अटीखातर अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम title=

मुंबई : पहिलं प्रेम फार कमी आणि नशीबवान व्यक्तींचं पूर्ण होतं. प्रेमात कठीण गोष्टींचा सामना फक्त सामान्य जनतेलाचं नाही तर सेलिब्रिटींना देखील करवा लागतो. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता अभिषेक बच्चनच्या नात्याची चर्चा होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसा दिवशी दोघांचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा रंगली होती.

त्यामुळे दोघांचे चाहते कधी त्यांच्या लग्नाची तारीख पक्की होणार या प्रतीक्षेत होते. पण तसं झालं नाही. कारण बच्चन आणि कपूर कुटुंबामध्ये मतभेद असल्यामुळे करिश्मा आणि अभिषेकचं लग्न होवू शकलं नाही. 

साखपुडा झाल्यानंतर करिश्माची आई बबीता यांनी बच्चन कुटुंबाकडे एक अट ठेवली. बच्चन कुटुंबाच्या संपत्तीचा काही भाग अभिषेकच्या नावे करावा... ज्यामुळे भविष्यात करिश्माला कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना कराला लागणार नाही...

रिपोर्टनुसार, जया बच्चन यांनी देखील कपूर कुटुंबासमोर एक अट ठेवली असल्याचं असं समोर आलं. लग्न झाल्यानंतर करिश्मा सिनेमांमध्ये काम करणार नाही...अशी जया बच्चन यांची अट होती..

करिश्माला ही अट मान्य नसल्यामुळे तिने अभिषेकसोबत लग्नाला नकार दिला. एवढंच नाही तर कपूर आणि बच्चन कुटुंबात मतभेद असल्यामुळे दोघांचं लग्न होवू शकलं नाही.