राजस्थानहून परतली करिना आणि तैमुर

तैमुर अली खान आणि इंटरनेट यांचं नातचं अतूट आहे.

Updated: Mar 2, 2018, 04:43 PM IST
राजस्थानहून परतली करिना आणि तैमुर  title=

मुंबई : तैमुर अली खान आणि इंटरनेट यांचं नातचं अतूट आहे.

जेव्हा जेव्हा तैमुरचा नवा फोटो येतो तेव्हा तो सोशल मीडियावर आवर्जून शेअर होतो. मीडियाप्रमाणेच इंटरनेटवर तैमुरचे अनेक चाहते आहेत. 

नुकताच तैमुर राजस्थानहून मुंबईत परतला आहे. विमानतळावर आल्यावर तैमुरचे क्लिक झालेले काही फोटो सोशल मीडियावर झपाट्याने शेअर झाले आहेत. 

तैमुर राजस्थान टूरवर  

काही दिवसांपूर्वी तैमुर आणि करिना कपूर राजस्थानमध्ये सैफ अली खानच्या भेटीला गेले होते. सध्या सैफ अली खान राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

शूटिंगमधून थोडा वेळ काढून करिना, तैमुर आणि सैफ यांनी उदयपूरची टूर केली. मात्र आता तैमुर आणि करिना होळीच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत परतले आहेत.  तैमुरच्या राजस्थान सफरीचे फोटो व्हायरल

 

 

Cute

A post shared by Taimur Ali Khan  (@taimuralipataudi) on

 

#kareenakapoor #tamiuralikhan #spotted

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

 

तैमुर इंटरनेटवर हीट  

सैफिनापेक्षा  तैमुर काय करतोय ? कुठे आहे ? याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना अधिक असते. त्यामुळे तैमुरचा येणारा प्रत्येक नवा फोटो सोशल  मीडियावर हीट असतो.  तैमुरच्या जन्मापासूनच त्याचा प्रत्येक नवा फोटो हा चर्चेचा विषय बनलेला असतो.