कोरोनाकाळात करीना कपूर चिंताग्रस्त, पोस्ट शेअर करत म्हणाली....

त्या पोस्टमधून समोर आलं चिंतेचं कारण  

Updated: Dec 18, 2021, 11:31 AM IST
कोरोनाकाळात करीना कपूर चिंताग्रस्त, पोस्ट शेअर करत म्हणाली.... title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा डोक वर काढतंय का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.  असं  असताना दिग्दर्शक करण जोहरने दिल्लीत एक पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. करणच्या पार्टीमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान  देखील होती. तेथून आल्यानंतर करीनाला कोरोनाची लागण झाली. यामुळे बेबोला करणची पार्टी महागात पडली असं म्हणायला हरकत नाही. 

कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे करीनावर उपचार सुरू आहेत. करीना सध्या कुटुंब आणि मुलांपासून दूर क्वारंटाईनमध्ये आहे. क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे करीनाला तिच्या मुलांची आठवण सतावत आहे. मुलांच्या चिंतेत असणाऱ्या बेबोने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत करीनाने लिहिले की, 'कोवीड आय हेट यू... मी माझ्या मुलांना मिस करत आहे, लवकरच या व्हायरसचा सामना करेन....' सध्या करीनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

करण जोहरच्या पार्टीतील करिना कपूरसह चार अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.  पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामधील आलिया भट्ट आणि मलायका अरोराची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.