मुंबई : गायिका नेहा कक्कर आजच्या घडीची प्रसिद्ध गायिका आहे. तिचे अनेक अल्बम चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. आपल्या मधून आवाजाने नेहाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. बॉलिवूड सिनेमांमधील अनेक हीट गाण्यांना नेहाने आवाज दिला. सोशल मीडियावर देखील फक्त आणि फक्त नेहाच्या आवाजाची चर्चा असते. पण एक प्रसिद्ध गायक हयात असता तर नेहाला ही गोल्डन संधी मिळाली नसती.
नेहा लहानपणापासूनचं गायक होण्यासाठी धडे गिरवले. पण एक प्रसिद्ध गायक आज हयात असता तर नेहा आणि त्याच्यामध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळाली असती. त्या गोड आवाजाच्या गायकाचं नाव होत, संदीप आचार्य.
संदीप आचार्यने इंडियन आयडॉलचा दुसरा सीझन जिंकून सर्वत्र चाहत्याच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. राजस्थान, बिकानेर येथे राहणारा संदीप आचार्यचा जन्म 04 फेब्रुवारी 1984 रोजी झाला. 'इंडियन आयडॉल'चा दुसरा सीझन जिंकून संदीप एका रात्रीत स्टार झाला.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 15 डिसेंबर 2013 रोजी 29 वर्षीय संदीपने जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संदीपला काविळचा त्रास होता. प्रकृती खालावल्यानंतर त्याला गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्याला वाचवता आले नाही. ज्यावेळी संदीपची प्रकृती खालावली होती, त्या वेळी तो बिकानेरमध्ये एका लग्नाला गेला होता. आजही संदीप आचार्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.