भारतीय रेल्वेबद्दल हे काय बोलून गेली करिना कपूर खान, लोकं करु लागले ट्रोल

Kareena kapoor Troll : करिना कपूरच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल होत आहे. 

Updated: Aug 20, 2022, 02:25 PM IST
भारतीय रेल्वेबद्दल हे काय बोलून गेली करिना कपूर खान, लोकं करु लागले ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड बेबो अभिनेत्री करिना कपूर (kareena Kapoor Khan) एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. पण तिचं या वक्तव्यावर अनेक जण तिच्यावर टीका करत आहे. करिनाची आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली. तिचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत. पण भारतीय रेल्वे बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ती ट्रोल होत आहे. (Kareena kapoor troll on railway statement)

करिना कपूर खान हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिनाची भूमिका अनेकांना आवडते. पण सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (Kareena Kapoor Khan jokes her character Geet from 'Jab We Met' increased Indian Railways' revenue)

भारतीय रेल्वेबद्दल काय म्हणाली करिना?

'जब वी मेट' चित्रपटातील गाण्यात करिना कपूर खानने चांगली भूमिका केली. तिच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतूक देखील झाले. या चित्रपटात करिना सोबत मुख्य अभिनेता शाहिद कपूर होता. ज्याला ती ट्रेनमध्ये भेटते. अभिनेत्रीने नुकतेच वक्तव्य केले की, 'जब वी मेट' या चित्रपटातील गाण्यामुळे भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढले आहे.'

करिना कपूरने म्हटले की, त्याच्या या गाण्यामुळे भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. माझे गाणे वाजवल्यानंतर हॅरेम पॅंटची विक्री आणि भारतीय रेल्वेचे उत्पन्न दोन्ही वाढले आहे.

करिना सोशल मीडियावर ट्रोल

करिनाचे हे वक्तव्य सध्या चर्चेत असून अनेक लोक करिनाला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले - करिना कपूर म्हणते की, जब वी मेटमधील गाण्यामुळे भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यास मदत केली. हे बॉलीवूड सेलिब्रिटी वास्तवापासून खूप दूर आहेत आणि मग त्यांना आश्चर्य वाटते की लोक त्यांच्याशी का जुळत नाहीत.

दुसरीकडे करिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच ती आमीर खानसोबत लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसली होती. पण या सिनेमावर ही खूप टीका झाली. सिनेमा वादात सापडल्याने कमाईवर त्याचा परिणाम झाला.