करीना कपूरने शेअर केलं बेडरूम सीक्रेट

करीना कपूर खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व स्टार्स किती घाबरले आहेत हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे

Updated: Apr 15, 2021, 08:21 PM IST
करीना कपूरने शेअर केलं बेडरूम सीक्रेट title=

मुंबई : बॉलिवूड कलाकार करीना कपूर, करण जोहर, मलायका अरोरा, प्रतीक गांधी  आणि अर्जुन कपूर एका नव्या शोमध्ये लवकरच दिसणार आहेत. या सर्व स्टार्सनी त्यांच्या नवीन शोबद्दल एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काय हे स्टार्स स्वयंपाकघरातील सगळे टास्क पूर्ण करु शकतील? मुख्य म्हणजे करिनाचं एक वाक्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत करिनाने बेडरूम सीक्रेट खुलेआम सांगितल्याचं पहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की मला झोपण्याच्या अगोदर तीन गोष्टी माझ्या जवळ नेहमी लागतात. या ३ गोष्टी काय आहेत नेमक्या जाणून घेवुयात

करीना कपूर खान आणि सैफ अली खान  कायम दोघें आपल्या लव लाइफमुळे चर्चेत असतात. दोघांची लव स्टोरी आणि केमिस्ट्री लोकांना खूप पसंद आहे. करीना कपूर खानने शोच्या शूटिंग दरम्यान बेडरूम सीक्रेट शेअर केलं.

सेलिब्रिटी कुकिंग शो Star VS Food शूटिंगच्या  दरम्यान मैत्रिण तान्या घावरी बरोबर खास गप्पा मारल्या. करीनाने यावेळी झोपण्याच्या अगोदर तीन गोष्टी माझ्याजवळ नेहमी लागतात एक वाइनची बॉटल, पजामा आणि पति सैफ अली खान.'

नुकताच करीना कपूर खानने तिच्या इन्स्टाग्रामवर या शोचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर खान पिझ्झा बनवताना दिसत आहे. तर दुसरीकडे करण जोहर, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर स्वयंपाक बनवण्याबद्दल त्रासलेल्या अस्वस्थेत दिसत आहेत. दरम्यान, करण जोहर व्हिडिओमध्ये असं म्हणताना दिसत आहे की, “आता कळालं की, ज्याचं जे काम असतं, तेचत्याने केलं पाहिजे.”

करिना कपूर खान तिच्या या शोबद्दल खूप खुश आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 7 तासात 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. करीना कपूर खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व स्टार्स किती घाबरले आहेत हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.