New Song Shola : नॅशनल क्रश रोहित सराफ आणि अकासाचं नवं गाणं 'शोला', प्रत्येक लग्नात वाजणार आता हेच गाणं

'शोला'मध्ये कमालीची एनर्जी आहे आणि नुकतीच आता लग्नाचा सीज़न सुरु झाला आहे आणि हे गाणं त्यासाठी परफेक्ट सुट होणारं आहे.

Updated: Apr 15, 2021, 05:58 PM IST
New Song Shola : नॅशनल क्रश रोहित सराफ आणि अकासाचं नवं गाणं 'शोला', प्रत्येक लग्नात वाजणार आता हेच गाणं title=

मुंबई : पॉप क्वीन अकासा आणि नॅशनल क्रश रोहित सराफमाझी लग्नाच्या हंगामाच्या सुरूवातीला तुमच्यासाठी एक धमाकेदार गाणं घेऊन आले आहेत, हे गाणं आपल्याला नाचायला भाग पाडतील एनर्जीने भरलेलं या गाण्याला अकासा आणि रोहित सर्राफ यांचं म्यूजिकल कोलॅब्रेशन आहे. एकामागोमाग एक नैय्यो, नागीन, अथे आ आणि दिल ना जानेया अशी हिट गाणी दिली आहेत.

त्याचबरोबर रोहित सर्राफने लुडो, मिसमॅच आणि द स्काई इज पिंक या सिनेमांत आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयावर राज्य केलं आहे. या गाण्यासाठी आकसा आणि चरण यांनी या गाण्याला कंपोज केलं आहे. हे गाणं एक उत्साहित मुलगी, लग्नाचं वाइब्स आणि रील जोड़ीच्या केमिस्ट्रीवर आहे.

हे गाणं 'द फ्यूचर वाईफ'च्या रीलच्या साथीने सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हे गाणे रिलीज होताच यावर पडदा उठला आहे की, पॉप क्वीन दुल्हन अकासाबरोबर काय होते आणि आता प्रेक्षकांकडे एक धमाकेदार पार्टी आणि संगीत गाणं भेटीला आलं आहे.रोहित सराफचं म्हणण आहे की, "शोलामध्ये कमालीची एनर्जी आहे आणि नुकतीच आता लग्नाचा सीज़न सुरु झाला आहे आणि हे गाणं त्यासाठी परफेक्ट सुट होणारं आहे.हे असं गाणं आहे जे तुम्ही गाता तसंच नाचता. मला आशा आहे की, चाहते प्रत्येक आनंदाच्या क्षणी हे गाणं ऐकतील.

अकासाच्या म्हणण्यानुसार ''मला खूप आनंद झाला की लग्नाच्या सिझनमध्ये ''शोला'' रिलीज झालं आहे. हे गाणे रिलीज होण्यापूर्वीच बरंच चर्चेत होतं, या गाण्याचं खूप कौतुक होत आहे. लोकांच्या मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहेचरण सोबत हे गाणं बनवण्याची प्रक्रिया खूपच वेगळी होती, मग ते लिखाण, कम्पोज़ किंवा गाणं असो. जेव्हा रोहितला या व्हिडिओसाठी विचारणा केली गेली होती तेव्हा माझं गाणे रिलीज करण्याबद्दलचा उत्साह आणखीनच वाढला होता. मला आशा आहे की, हे गाणे तयार करताना आम्हाला जेवढ एन्जॉय केलं, तितकंच चाहतेही हे गाणं एन्जॉय करतील"

गायक-लेखक-संगीतकार चरण यांच्या म्हणणं आहे की, एक कलाकार म्हणून मी नेहमीच असं गाणं बनवण्याचा प्रयत्न केला आहे की, जे लोकांना उत्साहित करेल आणि त्यांना आकर्षित करेल. 'शोला'मध्ये ती क्षमता आहे. हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे कारण की, आकासासोबत या गाण्यात एकत्र काम करण्याचा अनुभव खूप कमाल होता. रेडमोजो आणि आसा सिंह द्वारे निर्मित हे गाणं आता सगळ्या म्यूज़िक प्लॅटफार्म्सवर आहे.