करिना-सैफच्या दोन्ही मुलांच्या नावामागचं रहस्य अखेर उलगडलं

 पहिल्यांदा करीनाने आपला दुसरा मुलगा जेहला सुट्टीवर नेलं आहे.

Updated: Aug 18, 2021, 09:03 AM IST
करिना-सैफच्या दोन्ही मुलांच्या नावामागचं रहस्य अखेर उलगडलं  title=

मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. पहिल्यांदा करीनाने आपला दुसरा मुलगा जेहला सुट्टीवर नेलं आहे. करीनाच्या दोन्ही मुलांच्या नावांवरून वाद झाला आहे. पण आपल्या दोन्ही मुलांना नाव देण्यापूर्वी नावांची यादी बनवली होती का? याबाबत करीना-सैफने खुलासा केला आहे.

करीनाने दोन्ही मुलांची नावे कशी ठेवली?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने सांगितले की, दोन्ही मुलांचे नाव देण्यापूर्वी तिने कोणतीही यादी तयार केली नव्हती. तिने तिला आवडलेली नावे निवडली. ती आणि सैफ तैमूर आणि जेहच्या नावांची यादी करायला कधीच बसले नाहीत. करीना म्हणाली - हे कधीच घडले नाही.

मला माहित नाही. तैमूरसाठी सुद्धा ते फक्त आम्हाला आवडलेले नाव होते. ही कल्पना होती की एक कुटुंब म्हणून आपण आपल्या मुलांची नावे आवडीने घेतली पाहिजेत. कोणतीही वेगळी यादी तयार केलेली नव्हती. आम्ही असे कधीच बसलो नाही, असेही झाले नाही की निवडीसाठी नावे लिहू. आम्हा दोघांना नावे आवडली आणि आम्ही ती नावे मुलांना दिली.

करीनाने नुकतेच गर्भधारणेच्या प्रवासावर आपले पुस्तक लाँच केले. ज्यात अभिनेत्रीने मातृत्व आणि गर्भधारणेबद्दल अनेक खुलासे केले. पुस्तकाच्या उद्घाटनावेळी करीनाने करण जोहरसोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन केले. जिथे करीनाने तिच्या मुलाचे नाव जेह अली खान असल्याचे उघड केले.

मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले गेले की करीनाच्या मुलाचे पूर्ण नाव जहांगीर आहे. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा सैफिनाला खूप ट्रोल करण्यात आले. अनेक सेलिब्रिटींनीही करीना-सैफला पाठिंबा दिला.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा आहे. यामध्ये ती आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. करीना कपूर खानचा दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर हा पहिला चित्रपट असेल, जो प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर करीना कपूर खानने हंसल मेहताचा एक प्रोजेक्टही साईन केला आहे. करीनासुद्धा आता दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रासारखी निर्माती बनली आहे. करीना तिच्या नवीन इनिंगबद्दल उत्साहित आहे.