उंचीच्या शिखरावर पोहचल्यानंतरही करिना कपूरला का द्यावं ऑडिशन?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. 

Updated: Jul 31, 2022, 05:21 PM IST
उंचीच्या शिखरावर पोहचल्यानंतरही करिना कपूरला का द्यावं ऑडिशन?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून आता या चित्रपटातून एक मोठा खुलासा झाला आहे. जो अभिनेत्री करीना कपूर खानशी संबंधित आहे,. जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

एका मुलाखतीत याचा खुलासा करताना करीना कपूर खानने सांगितलं की, तिने 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिलं होतं. करीना म्हणाली की, आमिर खानच्या टीमला 'लाल सिंग चड्ढा'मध्ये ती कोणती भूमिका साकारणार आहे याबद्दल "100 टक्के खात्री" हवी होती. अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'तिचा पती सैफ अली खानने तिला स्क्रीन टेस्टसाठी प्रोत्साहन दिलं.' 

एवढंच नाही तर 'लाल सिंह चड्ढा'मधील तिच्या भूमिकेचं अभिनेत्रीने कौतुकही केलं. तिच्या भूमिकेबद्दल अभिनेत्री करीना कपूर खान म्हणाली, 'फॉरेस्ट गंपच्या जेनीची भूमिका कोणाला करायची नाही? अभिनेत्री पुढे म्हणाली की, अद्वैत आणि अतुल कुलकर्णी यांनी ते खूप सुंदर लिहिलं आहे. रुपाची व्यक्तिरेखा पाहिल्यावर ती खऱ्या अर्थाने 'लाल सिंग चड्ढा'ची आत्मा आहे.

आमिर आणि करीना कपूर खानसोबत या चित्रपटात नागा चैतन्य देखील दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाची क्रेझ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही निर्माण झाली असून आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.