'ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्याने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा Cute Photo

सुंदर फोटोची चर्चा 

Updated: Dec 27, 2019, 09:03 AM IST
'ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्याने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा Cute Photo  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच 'ये है मोहब्बते' Yeh Hai Mohabbatein फेम अभिनेता करण पटेलच्या Karan Patel  घरी एका चिमुकलीच आगमन झालं आहे. करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव Ankita Bhargava काही दिवसांपूर्वीच आई-बाबा झाले आहेत. यांनी पहिल्यांदाच आपल्या गोंडस मुलीचा फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

'मेहर' Mehr असं या बाळाचं नाव असून ख्रिसमसचं औचित्य साधून या दोघांनी बाळाचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत करणने आपल्या कुशीत मेहरला घेतलं असून अंकिता त्याच्या बाजूला आहे. या फोटोत बाळाचा फोटो स्पष्ट दिसत नाही आहे. (व्हायरल होणाऱ्या फोटोतील मुलगी आहे Celebrity Kid)

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 MERRY CHRISTMAS #RabDiMehr

A post shared by Karan Patel (@karan9198) on

करण आणि अंकिताने आपल्या मुलीचं नाव मेहर ठेवलं असून 14 डिसेंबर रोजी तिचा जन्म झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

All your blessings made our world beautiful, a heartfelt thankyou to all our well wishers  .... #RabbDiMehr 

A post shared by Karan Patel (@karan9198) on

करणने 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'केसर', 'काव्यांजली', 'करम अपना अपना' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. पण तो 'ये है मोहब्बते' या मालिकेमुळे लोकप्रिय झाला. एवढंच नव्हे तर करण 'खतरों के खिलाडी' या मालिकेत देखील झळकला होता.