Karan Johar ला 'या' स्टार किडनं मोठा धक्का, मांडीवर खेळवलं त्यानंच लॉन्चच्या ऑफरला नकार!

करण नेहमीच स्टारकिड्सला लॉन्च करतो असे आरोप त्याच्यावर करण्यात येतात. 

Updated: Nov 16, 2022, 10:50 AM IST
Karan Johar ला 'या' स्टार किडनं मोठा धक्का, मांडीवर खेळवलं त्यानंच लॉन्चच्या ऑफरला नकार! title=

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा घराणेशाही करतो असे नेहमीच ऐकायला मिळते. करण सगळ्या स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करतो असे म्हटले जात असताना, आता एका स्टार किडनं अभिनेता म्हणून लॉन्च करण्याच्या करणच्या ऑफरला नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या अनेक वर्षांपासून करण शाहरुख आणि गौरी खानचा (Shahrukh Khan And Gauri khan's Son) मुलगा आर्यन खानला धर्मा प्रोडक्शन या त्याच्या कंपनीतून करणार याकडे लक्ष देऊन होता. पण आता असे काही होणार नाही. अभिनेता म्हणून लॉन्च करण्याच्या ऑफरला आर्यननं (Aryan Khan) नकार दिला आहे. 

हेही वाचा : आधी पत्नी- मुलगी, नंतर मुलावर गोळीबार; 'या' अभिनेत्याच्या वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या रिपोर्ट्सनुसार आर्यनला सध्या अभिनय करायचा नसून पडद्यामागे चित्रपट बनवायचे असल्याचं म्हटले जातं आहे. अभिनेता नाही तर लेखक-दिग्दर्शक बनण्याची त्याची इच्छा आहे. शाहरुखच्या कुटुंबाच्या अगदी जवळ असलेल्या करण जोहरनं आर्यनला  वैयक्तिकरित्या सांगितले की त्याला तो लवकरच अभिनेता म्हणून लॉन्च करु इच्छितो, परंतु आर्यन यासाठी तयार नाही. रिपोर्ट्सनुसार, करणनं आर्यला अभिनेता म्हणून लॉन्च करण्याची ऑफर एकदा नाही तर तीनदा दिली आणि प्रत्येकवेळी आर्यननं त्याला नकार दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आर्यन मोठा झाला की मी त्याला माझ्या चित्रपटातून लॉन्च करेन असे करण अनेक वर्षांपासून मीडियात सांगत आहे. तो माझ्यामुलासारखा आहे मी त्यांला माझ्या मांडीवर खेळवलं आहे. आर्यन माझ्या डोळ्यासमोर मोठा झाला आहे. स्टारकिड्सना चित्रपटात लॉन्च करणाऱ्या करण जोहरवर घराणेशाही केल्याचा आरोप करण्यात येतो. विशेषत: 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, करणसोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक कुटुंबावर नेपोटिझमचा आरोप केला आणि नेपो-किड्सच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यावर मोहीम सुरु करण्यात आल्या. आता प्रेक्षकांना पूर्वीसारखी स्टार किड्सची क्रेझ दिसत नाही. दरम्यान, करणाला खान कुटुंबाकडून हा पहिलाच झटका मिळालेला नाही तर या आधी सुहानानेही करणला लॉन्चसाठी नकार दिला होता. सुहाना लवकरच झोया अख्तर दिग्दर्शित आर्चीज या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.