करण जोहरने आमिर खानच्या लैंगिक आयुष्याविषयी प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला, तुझी आई...

या एपिसोडमध्ये आमिर खान आणि करीना कपूर शोमध्ये पोहोचले. हे दोन्ही सुपरस्टार त्यांच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते.

Updated: Mar 14, 2023, 05:45 PM IST
करण जोहरने आमिर खानच्या लैंगिक आयुष्याविषयी प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला, तुझी आई... title=

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा(Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा लोकांच्या चर्चेचा विषय ठरतो. 'कॉफी विथ करण'चा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 7 वा सीझन हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या शोच्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि बेबो म्हणजे करीना कपूरनं (Kareena Kapoor) हजेरी लावली होती. हे दोघे 'लाल सिंग चढ्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. यावेळी करणनं करीना आणि आमिरला त्यांच्या सेक्स लाइफशी संबंधीत एक प्रश्न विचारला होता. 

या एपिसोडमध्ये आमिर खान आणि करीना कपूर शोमध्ये पोहोचले. हे दोन्ही सुपरस्टार त्यांच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. या चित्रपटात करणने करीना आणि आमिरला त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित काही अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारले.

या एपिसोडमध्ये करणने करीना कपूरला तिच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारला आहे की, मुले झाल्यानंतर सेक्स लाईफमध्ये मजा येते की नाही. यावर करीनाने त्याला मजेशीर उत्तर दिले जे तुम्हाला कळणार नाही. करीनाचं हे उत्तर जेव्हा करणने ऐकले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला.

हे प्रकरण इथेच संपलं नाही. यावर करणने उत्तर दिलं की,  माझी आई हा शो पाहते आणि तुम्ही माझ्याच सेक्स लाइफ विषयी प्रश्न विचारता. यावर आमिर बोलतो की, 'तुझ्या आईल तू लोकांच्या सेक्स लाइफविषयी चर्चा करतो त्यावर हरकत नाही.' करण जोहरच्या शोचा हा एपिसोड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा एपिसोड प्रेक्षकांना खूप आवडला होता
या एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि आमिरच्या विनोदी उत्तराचेही खूप कौतुक झाले. त्याचवेळी करिनानेही तिच्या विनोदबुद्धीने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. हा भाग कॉफी विथ करणच्या सर्वात मनोरंजक भागांपैकी एक आहे.