मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) अनेकदा वादात सापडला आहे. कपिल शर्मा सध्या पुन्हा एकदा नव्या वादांमुळे चर्चेत आला आहे. यावेळी कपिलवर अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' (Jhund) चित्रपटातील कलाकार आणि क्रूला त्याच्या शोमध्ये आमंत्रित न केल्याचा आरोप होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात ग्लॅमरस चेहरा नसल्याने कपिल शर्माने या चित्रपटाच्या टीमला त्याच्या शोमध्ये आमंत्रित केले नाही. या वादानंतर 'द कपिल शर्मा शो ट्रेंड होत असून लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
यावर आता चित्रपटाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी खुलासा केला आहे. सविता हिरेमठ म्हणाल्या की,
'आमच्या चित्रपटाचे प्रमोशन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाले. तोपर्यंत कपिल शर्मा एका आठवड्याच्या वैयक्तिक सुट्टीसाठी परदेशात निघून गेला होता. कपिल तिथून परत येईपर्यंत, त्यानंतर आम्ही पुन्हा शोमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही. शोमध्ये न जाण्यामागे हेच खरे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. द कपिल शर्मा शोची टीम फक्त बिग बजेट चित्रपट किंवा स्टार कास्टसह शो करते असे काही नाही.'
'झुंड' (Jhund) व्यतिरिक्त, विवेक अग्निहोत्रीच्या 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) कलाकारांवर कपिल शर्मा शोमध्ये 25 लाख रुपय घेऊन शो (The Kapil Sharma Show) मध्ये आमंत्रित केल्याचा आरोप आहे. या विधानावर विवेक अग्निहोत्री अजूनही ठाम आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कपिल शर्माने ट्विट करून ही एकतर्फी कथा असल्याचे म्हटले होते, मात्र या प्रकरणी वाहिनीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड या सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.