क्रिकेटर कपिल देव आण अभिनेत्री सारिका यांचं ब्रेकअप, यानंतर या अभिनेत्याच्या प्रेमात

जेव्हा क्रिकेटपटू कपिल देव आणि सारिका पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही अविवाहित होते. 

Updated: May 16, 2021, 05:19 PM IST
 क्रिकेटर कपिल देव आण अभिनेत्री सारिका यांचं ब्रेकअप, यानंतर या अभिनेत्याच्या प्रेमात title=

मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी 400 हून अधिक विकेट घेतले आहेत. कसोटी सामन्यात 5000हून अधिक रन मिळवले आहेत. कपिल देव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रेयसी रोमी भाटियासोबत रिलेशिपमध्ये आल्यानंतर 1980साली या दोघांनी लग्न केलं. या दोघांना अमिया देव नावाची मुलगी आहे. मात्र, कपिल यांच्या जीवनातील एक किस्सा देखील आहे ज्याची आपल्याला कदाचित माहिती नसेल.

खरं तर, आजच्या काळात दक्षिण भारतीय सुपरस्टार कमल हसन यांची एक्स पत्नी आणि बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री सारिका एकेकाळी कपिल देव यांच्या प्रेमात वेड्या होत्या, दोघंही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे आणि दोघंही लग्न करणार होते. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. अशा परिस्थितीत आपण जाणून घेऊया कपिल आणि सारिका यांच्यातील संबंध तुटण्याचं नेमकं कारण काय होते? दोघांचे लग्न का झालं नाही?

खूप प्रेमानंतरही कपिल आणि सारिकाचं लग्न का होऊ शकलं नाही
एका वृत्तानुसार, जेव्हा क्रिकेटपटू कपिल देव आणि सारिका पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही अविवाहित होते. या कपलची ओळख मनोज कुमार यांनी करुन दिली. पहिल्या भेटीनंतर दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले आणि हळूहळू या नात्याचं रुपांतर मैत्रीत झालं. यावेळी कपिल आणि सारिका या नात्यामुळे चर्चेत होते आणि या दोघांच्या अफेअर्सच्या बातम्या सातत्याने टीव्ही आणि वर्तमानपत्रांत छापल्या जात होत्या.

एका वृत्तानुसार या नात्यादरम्यान कपिल देव सारिकाला यांना त्यांच्या आई-वडिलांची ओळख करुन देण्यासाठी पंजाबला घेऊन गेले, कारण हे दोघंही लवकरच लग्न करणार होते. दोघांमध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं, मात्र अचानक एक दिवस त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये येवू लागल्या. मात्र, दोघांनी ब्रेकअप बद्दल कधीच खुलासा केला नाही.

पण एका रिपोर्ट्सनुसार कपिल देव यांच्या आयुष्यात दुसर्‍या व्यक्तीने एंट्री घेतल्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं, ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर त्यांची पत्नी रोमी भाटिया होती. ज्यांची भेट कपिल देव यांचे जवळचे मित्र सुनील भाटिया यांनी करुन दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल यांनी म्हणूनच सारिका यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

कपिलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सारिका कमल हसन यांच्यावर फिदा
ब्रेकअपनंतर कपिल यांनी 1980मध्ये रोमी भाटिया यांच्याशी लग्न केलं. त्याचवेळी सारिका त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्या प्रेमात होत्या. कमल हसन विवाहित होते, मात्र तरीही सारिकाच्या प्रेमात पुरते बुडाले होते.

यानंतर सारिका यांनी कमल हसनसोबत ब्रेकअप करण्याचं ठरविलं कारण सारिका यांना त्यांचं विवाहित जीवन खराब करायचं नव्हतं. पण त्यादरम्यान सारिका गर्भवती असल्याची बातमी येऊ लागली.

कमल आणि सारिका एकमेकांच्या प्रेमात ईतके वेडे होते की, हे दोघंही क्षणभरही एकमेकांशिवाय राहू शकतं नव्हते. त्यानंतर कमल हासन यांनी वाणीबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि सारिका यांच्याशी लग्न केलं. पण या दोघांचं नातंही फार काळ टिकू शकलं नाही आणि 2004मध्ये या दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला.