मुंबई : 'जमीन पर बैठी बहुत अच्छी लग रही है तू...' अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. गंगूबाई काठियावाडी' सिनेमा हुसैन जैदी लिखीत 'माफिया क्वीस ऑफ मुंबई' पुस्तकावर आधारित आहे. काठियावाडीतील महिलांच्या आयुष्याभोवती सिनेमाची कथा फिरत आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी शरीरची विक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी गंगूबाई यांनी दिलेला लढा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सिनेमात त्यांची भूमिका आलिया पार पाडत आहे. सध्या सिनेमातील काही डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशात अनेक मुलींनी देखील यावर व्हिडीओ तयार केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर अभिनेत्री कंगना रानौतने प्रश्न उपस्थित करत अशा पालकांवर सरकारने कारवाई करावी अशी इच्छा व्यक्त केली.
व्हायरल व्हिडीओवर कंगना म्हणते, 'वेश्या आणि दलाल यांच्या बायोपिकला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पवयीन मुलांचे शोषण करणाऱ्या सर्व पालकांवर सरकारने कारवाई करावी.' शिवाय तिने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देखील टॅग केलं.
पुढे कंगना म्हणते, 'माथ्यावर मोठी टिकली, हातात सिगारेट आणि आश्लील भाषेत सेक्स वर्करची नकल... या मुलींना करायला हवं आहे का? तिचे हावभाव पाहा... त्या मुलीला सेक्शुलाइज करणं योग्य आहे?' लहान मुलींनी असं करणं योग्य आहे का? असे प्रश्न कंगनाने सोशल मीडियावर उपस्थित केले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक लहान मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.