मुंबई : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलन प्रकरणी ट्विट करणं तिला चांगलचं महागात पडलं आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (Delhi Sikh Gurdwara Management Committee) कंगनाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यावर कंगनाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Delhi Sikh Gurdwara Management Committee member sends legal notice to Bollywood actor Kangana Ranaut over her tweet allegedly targeting farmers protesting against new farm laws
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2020
कंगना रानौतने केलेल्या ट्विट प्रकरणी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नवीन कृषी कायद्यांचे निषेध करणार्या शेतकर्यांना लक्ष्य बनवले जात असल्याचं मत समितीच्या सदस्यांनी मांडलं आहे.
Film mafia filed many cases on me, last night Javed Akhtar filed one more, Maharashtra government filing one case every hour now congress in Punjab is also joined the gang....
Lagta hai mujhe mahan banake he dum lenge
Thank you https://t.co/Q3w7WaCyCm— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 4, 2020
नोटीसमध्ये म्हटलं आहे की, 'कंगनाचं कार्यालय तोडल्यानंतर ज्याप्रमाणे तिने विरोध करण्याचा आधिकार गाजवला, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
ते शांततेने निषेध करू शकतात.' यावर अता कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कंगना म्हणाली, 'चित्रपट माफियांनी माझ्यावर अनेक केस केल्या आहेत. नुकताच जावेद अख्तरांनी देखील माझ्यावर केस केली आहे. महाराष्ट्र सरकारही सतत माझ्यावर आरोप करत आहे. आता पंजाब काँग्रेसने देखील या गटासोबत हात मिळवणी केली. त्यामुळे मला वाटतं -- मुझे महान बना कर ही दम लेंगे...' असं ट्विट तिने केलं आहे.