कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

 आजचा दिवस अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी सेलिब्रेशनचा आहे. 

Updated: Nov 8, 2021, 03:32 PM IST
कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी title=

मुंबई : आजचा दिवस अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी सेलिब्रेशनचा आहे. खरं तर आज चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मश्री हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे आणि हा सन्मान बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत तसंच गायक अदनान सामी यांना मिळाला आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक सेलिब्रिटींना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

कंगना आणि अदनान व्यतिरिक्त एकता कपूर आणि करण जोहर यांनाही हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. यावेळी 10 सेलिब्रिटींना पद्मभूषण, 102 सेलिब्रिटींना पद्मश्री आणि 7 सेलिब्रिटींना पद्मविभूषण मिळाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वांना हा सन्मान मिळाला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही उपस्थिती नोंदवली. या सोहळ्यात कंगनासोबत तिची बहीण रंगोलीही दिसली. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल या अभिनेत्रीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

गायक अदनान सामीची कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. यावेळी गायकासोबत त्यांची पत्नीही उपस्थित होती. याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सरिता जोशी यांना कला आणि रंगभूमीसाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.